Tarun Bharat

महाराष्ट्र : कोरोनाबाधितांनी ओलांडला 20.13 लाखांचा टप्पा

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील 24 तासात 2,405 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 47 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 20 लाख 13 हजार 353 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 50 हजार 862 एवढा आहे. 


कालच्या एका दिवसात 2106 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 19 लाख 17 हजार 450 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 43 हजार 811 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 95.24 % आहे. मृत्यू दर 2.53 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 43 लाख 15 हजार 227 नमुन्यांपैकी 20 लाख 13 हजार 353 (14.6%) रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 1 लाख 84 हजार 944 क्वारंटाईनमध्ये असून, 2 हजार 613 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

भगवद्गीतेमध्ये सामावला आपल्या सर्व उपनिषदांचा अर्क : ह.भ.प. कुलकर्णी

Tousif Mujawar

जिल्हा रुग्णालयातील चार डॉक्टर निलंबित

Patil_p

लोकल ट्रेन सुरू करण्याच्या मागणीवरून भाजप आक्रमक; मुंबई, ठाण्यात आंदोलन

Tousif Mujawar

मलकापूर बापरपेठ प्रवेशद्वारासमोरील वाहनांची गर्दी हटली; तरुण भारताच्या वृत्ताची घेतली दखल

Archana Banage

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर ‘एसीबी’चा छापा

Archana Banage

म्हैसाळ सामूहिक आत्महत्या प्रकरणी आठजण चौकशीसाठी ताब्यात

Abhijeet Khandekar