Tarun Bharat

महाराष्ट्र : खासगी बसेस आता पूर्ण क्षमतेने धावणार; मार्गदर्शक सूचना जारी

ऑनलाईन टीम / मुंबई : 


खासगी बसवाहतूक संपूर्ण क्षमतेने सुरु करण्यात यावी या वारंवार होणाऱ्या मागणीला महाराष्ट्र सरकारने अखेर परवानगी दिली आहे.  

त्यामुळे आता राज्यात सर्व खासगी कंत्राटी बसमधून 100 टक्के प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. परंतु खासगी बस वाहतूकीसाठी देखील सरकारने नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

बसमध्ये मास्क न घातलेल्या प्रवाशांना परवानगी नाही तसेच गाडीचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. प्रवासाच्या अगोदर सर्व प्रवाशांचे तापमान मोजणे बंधनकारक आहे. ताप, सर्दी, खोकला असलेल्या प्रवाशांना प्रवासाची परवानगी नाही, या त्यातील महत्त्वाच्या अटी असणार आहे.

  • प्रत्येक फेरीनंतर बसचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यकबसचे चौकशी कक्ष, तिकीट घर यांची वेळोवेळी स्वच्छता करावी तसेच तेथील कर्मचाऱ्यांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा.
  • बस जिथे उभ्या असतात तिथे गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • मास्क न घालणाऱ्या तर प्रवाशाला बसमध्ये प्रवेश देऊ नये. बसमध्ये प्रवाशांच्या वापरासाठी अतिरिक्त मास्क ठेवावे.
  • बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे थर्मल गनद्वारे तापमान मोजणे आश्यक आहे. एखाद्या प्रवाशाला ताप, सर्दी, खोकला असल्यास प्रवासाची परवानगी नाही. 
  • चालकाने जेवण, प्रसाधनगृह यासाठी बस थांबवताना स्वच्छ ठिकाणी बस थांबवावी.
  • बसमध्ये चढताना, उतरताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

Related Stories

आरोग्यनोंदींच्या डिजिटायझेशनसाठी केंद्राचे नवीन मिशन

Abhijeet Khandekar

परिवहन मंत्र्यांची आरटीओ कार्यालयाला अचानक भेट

Abhijeet Khandekar

महाराष्ट्र : बुधवारी 5 हजारपेक्षा अधिक रुग्णांना डिस्चार्ज!

Tousif Mujawar

’निरागस’ ला हनीटॅपमध्ये सापडायची सवयच होती

Patil_p

नगरसेवक काटवटे यांनी ठेकेदाराला खडसाविले

Patil_p

भाजप आमदार आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी

datta jadhav
error: Content is protected !!