Tarun Bharat

महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला

राज्यात १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान

आचारसंहिता आजपासून लागू

गोडोली / प्रतिनिधी :

महाराष्ट्राच्या ३४ जिल्ह्यांतील १४ हजार २३४  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी पुढील वर्षी म्हणजे १५ जानेवारी  रोजी मतदान होणार आहे. १८ जानेवारी रोजी मतमोजणी होईल. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली. 

एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या १ हजार ५६६  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ३१ मार्च रोजी मतदान होणार होते. परंतु कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने १७ मार्च  रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व  ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे.

नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबरपर्यंत
या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 31 डिसेंबर 2020 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल, असे त्यांनी सांगितले.

25 सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरणार

विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत, अशी माहितीही मदान यांनी दिली.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या :
ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189, गडचिरोली- 362. अशा एकूण- 14,234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.

Related Stories

साताऱयातील दुकाने पूर्णवेळ उघडा

Patil_p

राजू शेट्टी दूध संघवाल्यांचे पंटर रघुनाथदादा पाटील यांची टीका

Archana Banage

Sharad Pawar: कॉंग्रेसने आमच्याबरोबर चर्चा करायला हवी होती- शरद पवार

Abhijeet Khandekar

जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 5.42 वर

datta jadhav

शिकारीसाठी लावलेले 162 गावठी बॉम्ब पोलिसांकडून नष्ट

Patil_p

म्हसवड- वरकुटे रस्ता दुपदरीकरणाचे मंजूर काम सुरु करण्याची मागणी

Patil_p