Tarun Bharat

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या आश्वासना नंतर वळिवडे सरपंच आणि सदस्यांचे उपोषण मागे

वार्ताहर / उचगांव

वळिवडे गावामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने सुरु असणारा पाणी पुरवठा सुरळित नसल्या कारणाने येथील सरपंच अनिल पंढरे आणि इतर तीन सदस्य यांनी सोमवारपासून नियोजित केलेले आमरण उपोषण स्थगित केले आहे. प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी हे काम पंधरा दिवसात पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हे उपोषण स्थगित केले आहे. याबाबतची माहिती अशी की, येथील पाणीपुरवठा सुरळित नसल्यामुळे सरपंच अनिल पंढरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पोर्टलव्दारे तक्रार केली होती.

त्यानंतर सरपंच पंढरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात सोमवारपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी वळिवडे येथे येऊन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांशी चर्चा केली. येथील पाईपलाईनचे काम पंधरा दिवसांत पूर्ण करुन गावातील टाकीमध्ये पाणी देण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे हे उपोषण स्थगित करत असल्याचे सरपंच पंढरे यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता ए. डी. चौगुले, शाखा अभियंता एन. बी. लोकरे, घेवडे, सी. जी. नरके, एन. डी. जांभळे. एन. एस. वनमराठे, कंत्राटदार संतोष गंडगे, ग्रामपंचायत सदस्य भगवान पळसे, संजय चौगुले, योगेश खांडेकर आदि उपस्थित होते.

Related Stories

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत- अजित पवार

Archana Banage

शेतकयांच्यावर होत असलेल्या अन्यायाला कोण वाली

Patil_p

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन राजकारण तापणार; वाचा थोरात,पाटील,राऊत काय म्हणाले

Archana Banage

गांजा नशाबाजाकडून कबनुरात दोघांवर सशस्त्र हल्ला

Archana Banage

अरुण पाटील यांच्या वाढदिवस विशेषांकाचे माजी आ. महादेवराव महाडिक यांच्या हस्ते प्रकाशन

Abhijeet Khandekar

Sangli : प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणं हे राज्याचे मोठे नुकसान!- माजी मंत्री जयंत पाटील

Abhijeet Khandekar