Tarun Bharat

महाराष्ट्र झुकेगा नहीं!

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला. बाप-बेटे जेलमध्ये जाणारच असा पुनरुच्चार करत ”महाराष्ट्र झुकेगा नहीं…!” असे राऊत यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझे शब्द अधोरेखित करा…. मी पुन्हा सांगतो ‘बाप बेटे जेल जाऐंगे’ आणि बाप-बेटा यांच्या व्यतिरिक्त तीन केंद्रीय तपास यंत्रणेंचे अधिकारी आणि त्यांचे वसुली एजंट देखील तुरुंगात जातील. ”महाराष्ट्र झुकेगा नहीं!” असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

15 फेब्रुवारीला संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या या दोघांवर गंभीर आरोप केले होते. जे मोठय़ा वार्ता करतात, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करतात, ते सर्व जेलमध्ये जाणारच. महाराष्ट्र सरकार, येथील तपास यंत्रणा आणि पोलीस अनेक गोष्टींचा तपास करण्यासाठी सक्षम आहेत, असेही राऊत यांनी म्हटले होते. सोमय्या पिता-पुत्रांवरील आरोपानंतर राऊत यांनी ‘बाप-बेटे जेलमध्ये जाणार.. वेट ऍन्ड वॉच. कोठडीचे सॅनिटायझेशन सुरू आहे,’ असे ट्विटदेखील केले होते. दरम्यान, मंगळवारी नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे नील सोमय्यांवर काय कारवाई होणार हे पाहावे लागेल.

Related Stories

आमदारांना मोफत घरं मिळणार नाहीत

datta jadhav

एकटय़ाच वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱयाने लावली शिस्त

Patil_p

अदानींनी अंबानी, झुकरबर्गलाही टाकलं मागे

Archana Banage

ओमिक्रॉन : अमेरिका, ब्रिटन या देशांनी घेतले ‘हे’ निर्णय

Abhijeet Khandekar

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ७१० वर

Archana Banage

डॉ जे जे मगदूम शैक्षणिक संकुलात बी फार्मसी महाविद्यालयास मान्यता- विजय मगदूम

Archana Banage
error: Content is protected !!