Tarun Bharat

महाराष्ट्र : थकित वेतनासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आज आक्रोश आंदोलन

ऑनलाईन टीम / मुंबई : 


मागील तीन महिने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कामगारांना वेतन मिळालेले नाही. दिवाळी सारखा मोठा सण तोंडावर येऊन ठेपल्या असतानाही सरकार दखल घेत नाही, म्हणून महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने आज राज्यभरात आक्रोश आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात सर्व कर्मचारी आपल्या कुटुंबासह सहभागी होणार आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात सातारा रस्त्यावरून एस टी कॉलनी येथे आंदोलन होणार असून या आंदोलनात संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे आणि अध्यक्ष सचिन शिंदे उपस्थित राहणार आहेत.  तीन महिन्याचे थकीत वेतन तातडीने देण्यात यावेत ही या कामगारांची मुख्य मागणी आहे. 


राज्यातील  एक लाख 10 हजार कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. वेतन अभावी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची होणारी अस्वस्थता विचारात घेता दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे थकीत वेतन, थकित महागाई भत्ता आणि दिवाळी सण उचल न मिळाल्यास एसटी प्रशासनाविरोधात संघटनेमार्फत मुंबई येथील औद्योगिक न्यायालयात दाखल दाखल केला जाईल तसेच इंटक संघटने कडून देखील दिवाळीच्या पहिल्या दिवशी कामबंद आंदोलन केले जाणार आहे. 

Related Stories

भारत अजूनही हिंमत हरलेला नाही ; कोरोना स्थितीवरून पीएम मोदींचा देशवासीयांना धीर देण्याचा प्रयत्न

Archana Banage

भीमा कोरेगाव प्रकरण : आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर

Abhijeet Khandekar

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी घेतली पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट

Archana Banage

अवकाळी पावसाने रस्त्यावर मातीचे लोट

Patil_p

कळंबा कारागृहातील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांना गोळ्या घालण्याची धमकी

Abhijeet Khandekar

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान ; ‘या’ दिग्गजांनी बजवला मतदानाचा हक्क

Archana Banage
error: Content is protected !!