Tarun Bharat

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या जनरल सेक्रेटरीपदी रामचंद्र उर्फ आबा दळवी

Advertisements

ओटवणे / प्रतिनिधी:

      महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या जनरल सेक्रेटरीपदी विलवडे गावचे सुपुत्र तथा नवी मुंबई महापालिकेचे परिवहन सभापती रामचंद्र उर्फ आबा धर्माजी दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी के. सि. वेणूगोपाळ यांनी ही निवड जाहीर केली. मूळचे विलवडे येथील आबा दळवी उद्योग व्यवसायानिमित्त नवी मुंबईत स्थायिक असून दळवी यांचे घराणे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. दळवी यांचे वडील कै धर्माजी दळवी यांनीही काँग्रेस पक्षात महत्त्वाची पदे भूषविली. आबा दळवी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक आहेत. सध्या आबा दळवी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सेक्रेटरी होते. नवी मुंबई जिल्हा काँग्रेस सरचिटणीस तसेच पक्षात अनेक महत्त्वाच्या पदावर काम करून काँग्रेस वाढीसाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. तसेच विविध उपक्रमातून त्यांनी काँगेसचे कार्यकर्ते घडविले. पक्ष संघटनेतील त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीच्या सेक्रेटरी पदावरून त्यांची जनरल सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली आहे. नवी मुंबई व विलवडे परिसराच्या शैक्षणिक, सामाजिक, क्रिडा, धार्मिक कार्यात आबा दळवी नेहमी अग्रस्थानी असतात. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून त्यांनी अनेक समाजपयोगी उपक्रमांना तसेच गोरगरीबांना वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे. तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी भर वस्तीत शिरून नुकसान झालेल्या विलवडे गावातील पूरग्रस्तांना त्यांनी अडीच लाखाची मदत केली होती. आबा दळवी यांच्या या निवडीबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Related Stories

कृषिकन्या करताहेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Tousif Mujawar

टेंडर 50 लाखाने वाढले, तरी कचरा तसाच!

NIKHIL_N

शेतकऱयांचा कल आता हंगामी शेतीकडे

Archana Banage

होमक्वारंटाईन तरूणाचा चिपळुणात मृत्यू

Patil_p

1200 मेट्रिक टन धान्याची भिजून नासाडी

NIKHIL_N

सिंधुदुर्गातील ‘वेटलँड’ आजपासून ऑनलाईन

NIKHIL_N
error: Content is protected !!