Tarun Bharat

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा एकूण निकाल 90.66 टक्के

ऑनलाईन टीम / पुणे : 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी – मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( बारावी) परीक्षेचा आज जाहीर झाला. महाराष्ट्र राज्याचा एकूण निकाल 90.66 टक्के लागला असून यंदा देखील निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 93.88 टक्के तर मुलांचा निकाल 88.4 टक्के लागला आहे. यंदा निकाल 4.78 टक्क्यांनी वाढला आहे. 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी निकाल जाहिर केला. मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहता येईल. विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत www.mahresult.nic.inwww.hscresult.mkcl.org आणि www.maharashtraeducation.com या संकेतस्थळांवर निकाल पाहू शकतील. तसेच विद्यार्थ्यांना यावरून गुणपत्रिकेची प्रिंटआऊट देखील घेता येणार आहे. 

यावर्षी परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून सर्व शाखांमधून एकूण 14,20,575 नियमित विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. त्यापैकी 14,13,687 विद्यार्थी प्रविष्ट झाले व त्यापैकी 12,81,712 उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 90.66 आहे. तर 9 विभागांच्या सर्व शाखांमधून  एकूण 86,739 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 86,341 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 33,703 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची एकूण निकालाची टक्केवारी 39.3 टक्के आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 93.57 टक्के लागला आहे. 

यंदा कोकण विभागाची निकालात बाजी असून कोकणचा निकाल 95.89 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा निकाल असून 88.18 टक्के इतका आहे. 


विभागीय मंडळ निहाय निकाल : 


पुणे : 92.50 टक्के 

नागपूर : 91.65 टक्के 

औरंगाबाद : 88.18 टक्के 

मुंबई : 89.35 टक्के 

कोल्हापूर : 92.42 टक्के 

अमरावती :92.09 टक्के 

नाशिक : 88.87 टक्के 

लातूर : 89.79 टक्के 

कोकण : 95.89 टक्के 


यंदा कला शाखेचा निकाल 82.63 टक्के, वाणिज्यशाखेचा निकाल 91.27 टक्के, विज्ञान शाखेचा निकाल 96.93 टक्के तर एमसीवीसीचा निकाल 86.07 टक्के इतका लागला आहे. 

17 ते 27 जुलै या कालावधीत गुण पडताळणीसाठी, तर 17 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीत छायाप्रतीसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

Related Stories

मनोहर पर्रिकरांच्या मुलाला आपची खुली ऑफर

Abhijeet Khandekar

पुणे विभागातील 2 लाख 63 हजार 703 रुग्ण कोरोनामुक्त

Tousif Mujawar

गेट वे ऑफ इंडियावरील आंदोलकांची पोलिसांकडून आझाद मैदानावर रवानगी

prashant_c

“मी काश्मिरी पंडित; माझ्या सर्व बंधूंना आश्वासन देतो की”…. – राहुल गांधी

Archana Banage

पुण्यातील गोल्डमॅन सम्राट मोझे यांचे निधन

Tousif Mujawar

केंद्राने नागालँडचा अफ्सा कायदा 6 महिन्यांसाठी वाढवला

Abhijeet Khandekar