Tarun Bharat

महाराष्ट्र : मागील 24 तासात 11,060 रुग्ण कोरोनामुक्त!

  • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.35 %


ऑनलाईन टीम / मुंबई :


महाराष्ट्रात मागील 24 तासात 11 हजार 060 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 15 लाख 62 हजार 342 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 91.35 % आहे. 


दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 5, 027 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 17 लाख 10 हजार 314 वर पोहचली आहे. सध्या 1 लाख 02 हजार 009 रुग्ण उपचार घेत आहेत. शुक्रवारी दिवसभरात 161 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 44 हजार 965 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.63 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 93 लाख 18 हजार 544 नमुन्यांपैकी 17 लाख 10 हजार 314 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 10 लाख 59 हजार 499 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 8 हजार 879 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

  • शहर     कोरोनामुक्त रुग्ण संख्या 
  • मुंबई          234551
  • ठाणे 206338
  • पुणे             307867
  • औरंगाबाद    40691
  • सिंधुदुर्ग        4513
               

Related Stories

पुणे विभागात 11,298 क्विंटल भाजीपाल्याची आवक

datta jadhav

राजशिष्टाचार हा फक्त महाराष्ट्रानेच पाळायचा का?

datta jadhav

125 पैकी 4 व्यावसायिक बाधित

Patil_p

अधिवेशन काळात संसदेवरही मोर्चा काढणार

datta jadhav

राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

Archana Banage

साखर उद्योगात गुंतवणूक करण्याची मानसिकता ठेवावी

datta jadhav