Tarun Bharat

महाराष्ट्र : मागील 24 तासात 191 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 191 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 22 हजार 460 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 311 पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत आढळलेल्या एकूण 22,460 कोरोनाबाधित पोलिसांपैकी आतापर्यंत 19 हजार 022 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

  • 3,199 पोलिसांवर उपचार सुरू


सद्यस्थितीत राज्यात 3199 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  तर आतापर्यंत 239 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. 

Related Stories

अकोल्यात कोरोनाग्रस्ताची गळा चिरून आत्महत्या

prashant_c

सोलापुरात आज 16 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 5 जणांचा बळी

Abhijeet Shinde

रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱया युवकांवर गुन्हा

Patil_p

मान्सून महाराष्ट्रात दाखल

datta jadhav

वादळी पावसाने उद्योग व्यवसायिकांचे कोट्यावधींचे नुकसान

Abhijeet Shinde

रत्नागिरी : माडबन मिठगवाणे परिसरात शिकारीसाठी वापरण्यात येणारा गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!