Tarun Bharat

महाराष्ट्र : मागील 24 तासात 6 हजार पेक्षा अधिक रुग्ण कोविडमुक्त!

  • मंगळवारी 4,909 नवे रुग्ण; 120 मृत्यू 

ऑनलाईन टीम / मुंबई :


महाराष्ट्रात मागील 24 तासात 6,973 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 15 लाख 31 हजार 277 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 90.31% आहे.

 
दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 4,909 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 16 लाख 92 हजार 693 वर पोहचली आहे. सध्या 1 लाख 16 हजार 543 रुग्ण उपचार घेत आहेत. मंगळवारी दिवसभरात 120 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 44 हजार 248 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.61 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 91 लाख 20 हजार 515 नमुन्यांपैकी 16 लाख 92 हजार 693 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 17 लाख 95 हजार 666 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 11 हजार 969 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

आता NDA परीक्षा मुलींनाही देता येणार ; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Archana Banage

मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेच्या तीन शतकांपूर्वीच्या स्मृतींना उजाळा!

Archana Banage

शिरोळ नगर परिषदेच्या विषय समितीच्या सभापती पदाची निवडणूक बिनविरोध

Archana Banage

नव्या कोरोना व्हेरिएंटबाबत पंतप्रधान मोदींनी घेतली तातडीची बैठक

Abhijeet Khandekar

शिरोळमध्ये दररोज 400 निराधारांना जेवणाची सोय

Archana Banage

मुलायमसिंह यांच्या सूनबाई भाजपात?

datta jadhav
error: Content is protected !!