Tarun Bharat

महाराष्ट्र : यंदाच्या गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी

ऑनलाईन टीम / मुंबई : 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणोशोत्सव देखील साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. शासनाने दिलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांमुळे सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांवर गणोशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक मर्यादा आल्या आहेत.  


मार्गदर्शक सूचना : 

 • सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूटांची आणि घरगुती गणेश मूर्ती 2 फूटांची असावी.
 • मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.
 • सार्वजनिक गणपतींच्या सजावटीत कोणतीही भपकेबाजी नसावी. 
 • पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी धातू, संगमरवरी मूर्तींचे पूजन करावे. शक्यतो शाडूच्या मातीच्या मूर्तीचे पूजन करावे. 
 • गणेश मूर्तींचे विसर्जन शक्यतो घरी किंवा कृत्रीम विसर्जन स्थळी करावे.
  सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक कार्यक्रम, रक्तदान शिबीरे यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करावे.
 • आरती भजन, किर्तनाच्या कार्यक्रमात गर्दी होणार याची दक्षता घ्यावी.
 • सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपात निर्जंतुकीकरण, थर्मल स्क्रिनींग सारख्या पर्यायाची व्यवस्था करावी. 
 • मंडपात दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क, सॅनिटायझर पाळण्याकडे लक्ष देण्यात यावे.
 • गणेशोत्सवात स्वेच्छेने दिलेल्या वर्गणी, देणगीचा स्वीकार करा. आरोग्य आणि सामाजिक विषयी संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित कराव्यात.
 • सार्वजनिक मंडळांनी श्रींच्या ऑनलाईन दर्शनसाठी, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक यारख्या माध्यमांची व्यवस्था करावी.
 • सार्वजनिक गणेशोत्सव आणि घरगुती श्री गणेशांच्या मूर्तींची आगमन किंवा विसर्जन मिरवणूक काढू नयेत. विसर्जनावेळी पारंपरिक पद्धतीने होणारी आरती घरुनच करुन येणे. विसर्जन स्थळी नागरिकांना जास्त वेळ थांबता येणार नाही.
 • माहापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने गणेश मुर्तींच्या विसर्जनसाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी असे शासनाकडून सांगण्यात आले आहे.


गणेशोत्सवाच्या काळात शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असणार आहे. सरकारच्या या नवीन मार्गदर्शक सूचनांनंतर प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या काळात आणखी काही सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

Related Stories

”अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता”

Archana Banage

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्याचे संकेत, मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

Archana Banage

महाराष्ट्र : दिवसभरात 3 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची मंजुरी

Archana Banage

राज्य उत्पादन शुल्क, गारगोटी पोलीस व गुन्हे अन्वेषण शाखेची संयुक्त कारवाई

Archana Banage

अनुष्का शर्माला आली विराटची आठवण; सोशल मिडियावर भावनिक पोस्ट

Archana Banage