Tarun Bharat

महाराष्ट्र राज्याचा दहावीचा निकाल उद्या ऑनलाईन होणार जाहीर 

ऑनलाईन टीम / पुणे : 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी – मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यामिक शालांत प्रमाणपत्र ( दहावी) परीक्षेचा नऊ विभागांचा (पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण) निकाल उद्या म्हणजेच 29 जुलै 2020 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार असल्याची माहिती मंडळचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली. 


विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत www.mahresult.nic.inwww.sscresult.mkcl.org आणि www.maharashtraeducation.com या संकेतस्थळांवर निकाल पाहू शकतील. तसेच विद्यार्थ्यांना यावरून गुणपत्रिकेची प्रिंटआऊट देखील घेता येणार आहे. 
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल एकत्रितपणे पाहता येईल. 

ऑनलाइन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन स्थलांतर प्रमाणपत्रासाठी मंडळाच्या http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर आणि शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय या परीक्षेपासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 


गुणपडताळणीसाठी विद्यार्थी 30 जुलै ते 8 ऑगस्टपर्यंत, छायाप्रतीसाठी 30 जुलै ते 18 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. त्यासोबत ऑनलाइन पद्धतीने शुल्क (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यु पी आय आणि नेट बँकिंग) याद्वारे भरता येणार आहे. 

Related Stories

जतमध्ये व्यापारी संकुलातील पाच कार्यालये चोरट्यांनी फोडली

Abhijeet Khandekar

निवडणूक आयोगाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात?

datta jadhav

संगीतमार्तंड पंडित जसराज यांना शास्त्रीय गायन-वादनाव्दारे श्रद्धांजली

Tousif Mujawar

मी शिवसेनेचाच; आमदार राजन साळवींनी स्पष्ट केली भूमिका

Archana Banage

सोलापूर जिल्ह्यात उद्यापासून प्रतिदिन सहाशे दुचाकी सोडणार

Archana Banage

5.82 लाख शेतकऱ्यांनी भरली 511 कोटी रुपयांची थकबाकी

Tousif Mujawar