प्रतिनिधी / विटा
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळावर डॉ. श्रीधर तथा राजा दीक्षित यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली असून अध्यक्ष व ३० सदस्यांची पुढ़ील तीन वर्षाच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील लेंगरे गावचे सुपुत्र आणि शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी समन्वयक प्रा. संजय ठिगळे यांची वर्णी लागली आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळावर विविध क्षेत्राशी निगडीत अध्यक्ष व 30 सदस्य अशा एकूण 31 सदस्यांची तीन वर्षाच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती करण्यात आली होती. या मंडळाचे अध्यक्ष श्री. दिलीप करंबेळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर मंडळाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. या समितीत नवीन सदस्यांची नियुक्ती झाली आहे. सांगली जिल्ह्यातील लेंगरे गावचे सुपुत्र आणि शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी समन्वयक, सांगलीतील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे प्रा. संजय ठिगळे यांची समितीवर वर्णी लागली आहे. त्यांच्या निवडीचे परिसरातून कौतुक होत आहे.


next post