Tarun Bharat

महाराष्ट्रात लॉकडाऊन निश्चित; दोन दिवसांत होणार निर्णय

Advertisements

प्रतिनिधी / मुंबई

राज्यात कोरोनाचा कहर होत असताना विकेंड लॉकडाउनला धरूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांच्या लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासह काँग्रेसनेही संपूर्ण लॉकडाऊनला विरोध केला. त्यामुळे महाविकास आघाडीतच लॉकडाऊनबाबत मतभेद असल्याचे उघड झाले. मात्र कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक असल्याचे मुख्यमंर्त्यांचे म्हणणे आहे. उद्या टास्क फोर्सच्या बैठकीनंतर याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतेय. राज्यातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लॉकडाऊन लागू करण्याच्या तयारीत आहे. याबाबतचा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी  सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली.ऑनलाईन होणार्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण,  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

राज्यातील स्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. सर्वांनी सहकार्य करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. राज्यातील स्थिती पाहता जनतेला थोडी कळ सोसावी लागेल. तज्ञांच्या मते १४ दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा आहे. तज्ञांच्या मताला मुख्यमंर्त्यांनीही दुजोरा दिलाय. मात्र, मुख्यमंत्री किमान ८ दिवस कडक लॉकडाऊन करण्याच्या विचारात आहेत. आठ दिवसानंतर एक एक गोष्ट हळू हळू सुरु करु, अशी भूमिका मुख्यमंर्त्यांनी मांडली आहे.

काँग्रेस नेत्यांची भूमिका

राज्यातील आजच्या स्थितीत लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले. हातावर पोट असणाऱ्यांचा विचार करावा लागेल. मृत्यू थांबवण्यासाठी सर्वोत्तम उपाय करा. वेळप्रसंगी कटू निर्णय घ्यावे लागले तरी तो स्वीकारायला हवा, असेही पटोले म्हणाले. राज्यात कटू निर्णयाची अंमलबजावणी केली तरत कोरोनाची साखळी तुटेल, असे ते म्हणाले.

लॉकडाऊन किंवा कठोर निर्बंध लावायचे असतील तर गरीबांचे नुकसान होणार नाही अशी व्यवस्था करावी लागेल. पूर्ण लॉकडाऊन नको आणि सर्व सुरुही नको, मध्यबिंदू काढा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.

गरीब वर्गाचा विचार व्हावा

सर्वांचे मत जाणून मुख्यमंर्त्यांनी निर्णय घ्यावा. आमचे सहकार्य असेल. पण, राज्यासाठी जो निर्णय घेतला जाईल. त्यात पुणे आणि पिंपरील्लचिंचवडचा समावेश करू नये. एक आठवड्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडला त्यातून वगळण्यात यावे. निर्णय लागू करू नये. स्थानिक प्रशासनच्या स्तरावर निर्णय घेऊ, असे पवार म्हणाले. लॉकडाऊन जाहीर झाल्यास गरीब वर्गाला काय मदत देता येईल याबद्दल निर्णय घेतला पाहिजे. गरीबांना मदत देण्याची माझी भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.

तब्बल दोन तासातहुन अधिक काळ चाललेल्या या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात सोमवार ते शुक्रवार कठोर निर्बंध लावण्यात आल्यानंतरही राज्यातील रूग्णसंख्येत काही ही फरक पडलेला नाही ,कोरोना लसीचा दुसरा डोस देऊनही लोक पॉझिटिव्ह होत आहेत. हा मुद्दा पंतप्रधान मोदींसमोर मांडला होता. सध्या कोरोनाची साखळी तोडणे  आणि आरोग्य सुविधा वाढवणं गरजेचं आहे. लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यायचा झाल्यास तो एकमताने घेतला गेला पाहिजे. कालच निर्णय झाला असता पण देवेंद्रजी आपण नव्हता म्हणून आजची ही बैठक बोलावली आहे. लॉकडाऊन लावल्यास महिन्याभराच्या आत आपण परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो. पण एकमत झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही, असे मत मुख्यमंर्त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडले.

आता लॉकडाऊन करायची वेळ आली आहे, कारण सक्रिय रूग्णांची वाढणारी संख्या आणि यंत्रणांवर येणारा ताण लक्षात घेता पुढे विस्फोटक परीस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे निर्णय घेण्याची वेळ आली आहे, लॉकडाऊन जरी पर्याय नसला तरी जगानेही तो स्वीकारला आहे.असे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. याशिवाय सर्वांच्या सूचना ऐकल्या, चांगल्या आहेत. पण निर्बंध आणि सूट दोन्ही एकाचवेळी शक्य नाही. येत्या दोन दिवसात निर्णय घेऊ, असें मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तर जनतेचा उद्रेक होईल : फडणवीस

पूर्ण लॉकडाऊन केला तर उद्रेक होईल. मुख्यमंर्त्यांनी मंर्त्यांना आवरावं, सतत पेंद्राकडे बोट दाखवाल, तर आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करु नका, व्यापार्यांचे गेले वर्ष त्यांचे वाया गेले. कर, वीज बिल कर्ज व्याज भरावे लागत आहेत. त्यामुळे जीवन चालवायचे कसे हा प्रश्न जनतेसमोर आहेत. हे सर्व लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, निर्बंध असायला हवेत, पण जनतेचा उद्रेक लक्षात घ्यायला हवा, असे  देवेंद्र फडणवीस  म्हणाले.

भाजपने राजकारण थांबवावं  : नाना पटोले

आम्ही लॉकडाऊनची भूमिका घेतली आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक, मात्र विरोधक अजूनही राजकारण करत आहे. आधी मदत मग लॉकडाऊन असं विरोधकांचं म्हणणं आहे. पण सध्या जीव वाचवणं आवश्यक आहे. सध्याची राज्यात परिस्थिती बिकट आहे. भयानक स्थितीला सामोरं जावं लागत आहे. पेंद्राने सर्वात मोठं पाप केलं, लसीकरणात भाजपविरोधी राज्यांना कमी लस दिली. रोज जवळपास 6 लाख लसीकरणाचं टार्गेट होतं. पण लसी अत्यल्प पुरवल्या. केवळ राजकारण सुरु आहे.

मनसेचा विरोध

लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध यांना मनसेचा विरोध आहे ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या रुग्णालयात असल्याने मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पक्षामार्फत ही भूमिका जाहीर केली

आमदारांचा निधी कमी करा, कामगारांना द्या : चंद्रकांत पाटील

आमदारांचा विकासनिधी 2 कोटीने कमी करावा आणि कामगारांना 5 हजार रुपये द्यावे. कठोर निर्बंध आणि जगणं यात समन्वय साधला गेला पाहिजे सरकारला सल्ला देणार्यांना काय जातय लॉकडाऊन करा बोलायला.

लॉकडाऊन नको, मध्यबिंदू काढा  : अशोक चव्हाण

अशोक चव्हाण म्हणाले, आव्हानात्मक परिस्थिती आपल्याकडे आहे. लॉकडाऊन किंवा निर्बंध लावायचे असतील तर गरिबांचंही नुकसान होणार नाही अशी व्यवस्था करावी लागेल. पूर्ण लॉकडाऊनही नको आणि सर्व सुरु नको, मध्यबिंदू साध्य करायला हवा

Related Stories

अयोध्या अन् साधू-संतांच्या छावण्या

Patil_p

पुणे विभागातील 5.72 लाख पेक्षा अधिक कोरोनाबाधित बरे

Rohan_P

“बार मालकांबाबत शरद पवारांची कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला”

Abhijeet Shinde

पाचवी बैठक निष्फळ; कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम

datta jadhav

‘कोरोनाला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करा’

Rohan_P

प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह ; पंचनामा झाला तरी नुकसानभरपाई नाही

Abhijeet Shinde
error: Content is protected !!