Tarun Bharat

महाराष्ट्र शासनाची नेम प्लेट लावून फिरणार्‍या तोतया क्लार्कला अटक

Advertisements

वार्ताहर/गोकुळ शिरगाव

महाराष्ट्र शासनाचे महसूल व वनविभाग जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे क्लार्क असून इनोवा गाडीत महाराष्ट्र शासनाची नेम प्लेट लावून फिरणार्‍या तोतया क्लार्कला गोकुळ शिरगाव पोलिसांनी इन्होवा कार जप्त करून त्या तोतया क्लार्क वर गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले. चालक गजानन रवींद्र पाटील (वय-33 रा. कनेरी, ता. करवीर) असे या ताब्यात घेतलेल्या तोतया क्लार्कचे नाव आहे.

राज्यात कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रत्येक भागात संचारबंदी लागू असून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. यामध्ये आज गोकुळ शिरगाव एमआयडीसी कणेरीवाडी फाट्यावर गोकुळ शिरगाव पोलीसांना इन्होवा गाडी (MH.50 M 7860) या गाडीमध्ये महाराष्ट्र शासन असे लिहिलेले स्टिकर असलेली कारची गोकुळ शिरगाव पोलिसांनी चालक गजानन पाटील याची चौकशी केली. पाटील याने गळ्यात महाराष्ट्र शासनाचे आयकार्ड घातले होते. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपण वनविभाग महसूल खाते व जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी क्लार्क असून मला हे जिल्हाधिकारी कार्यालयने आयडी कार्ड दिल्याचे सांगितले. पोलिसांना याबाबत संशय आला असता त्यांनी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे व करवीर प्रांत अधिकारी नावडकर यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आमच्या कार्यालयात असा कोणताही क्लार्क नसल्याचे सांगितले.

पोलिसांनी पाटील याच्या आयकार्डचा फोटो काढून जिल्हाधिकारी कार्यालयाला व्हाट्सअप वर पाठवून कार्यालयातून माहिती घेतली असता हा आपल्या कार्यालयाचे बिलकुल संबंधित नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच पाटील याने हे आयडी कार्ड व गाडीवर लावलेले स्टिकर बोगस असून मी कुठे शासकीय नोकरीत नसल्याची कबुली दिली.

या घटनेचे गांभीर्य ओळखून गोकुळ शिरगाव पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकारी करवीर विभाग डॉक्टर प्रशांत अमृतकर यांना ही माहिती दिली. या कारवाई वेळी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल दिलीप तिवडे. उदय कांबळे, बाजीराव पवार .सुहास संकपाळ पोलीस नाईक रजपूत, संजू मुंडे आदीनी ही कारवाई केली.

Related Stories

गणेश मंडळाकडून मूर्तीचे बुकिंगच नाही

Patil_p

आजरा तालुक्यातील शिवसेना ‘मातोश्री’सोबत!

Kalyani Amanagi

शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,मुख्यमंत्री आमचेच पण…

Abhijeet Khandekar

भाषण नको रेशन द्या

Archana Banage

विनाकारण फिराल तर कारवाईला सामोरे जाल…

Patil_p

कोल्हापूर : मलकापुरातील ‘त्या’ बेपत्ता युवकांचा मृतदेह सापडला

Archana Banage
error: Content is protected !!