Tarun Bharat

महाराष्ट्र शासनाने वाळू उपशाला परवानगी द्यावी : जि. प. सदस्य अशोकराव माने

शिरोळ / प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने नदीच्या पात्रातील वाळू  उपसा करण्यास परवानगी द्यावी यामुळे काही प्रमाणात महापुराचा धोका टळू शकेल व कोट्यावधी रुपयाचं महसूल  मिळणार आहे अशी मागणी जि प सदस्य  अशोकराव माने यांनी केली आहे

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री बाळासाहेब थोरात यांना लवकरच आपण याबाबत मागण्याचे निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले शिरोळ तालुक्यामध्ये कृष्णा पंचगंगा वारणा व दूधगंगा चार नद्या वाहत असून  गेल्या सहा वर्षांमध्ये या नदीच्या पात्रात.  प्रचंड प्रमाणात वाळूचा साठा वाढला आहे  यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे चालू वर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी शासनाने वाळू उपसा परवानगी द्यावे यामुळे बांधकामा बरोबर वाळू व्यवसायात असलेल्या हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे वाळू उपसा केल्यामुळे काही प्रमाणात पुराचा धोका काही कळू शकेल शासनास कोट्यावधी रुपयांचा महसूल मिळणार आहे याकरिता मंत्री उद्धव ठाकरे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जातीने लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अशी मागणीही करणार असल्याचे दलितमित्र अशोकराव माने यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले 

तालुक्यांमध्ये दानोळी कोथळी उमळवाड उदगाव शिरटी  अर्जुनवाड  कनवाड हसूर औरवाड  गौरवाड आलास कवठेगुलंद खिद्रापूर यासह अन्य भागात वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केला जात होता काही वाळू ठेकेदारांनी कर्ज काढून कोट्यावधी रुपये चा ठेका घेतला आहे परंतु वाळू उपसा बंद असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले असून शासनाने समन्वयाने मार्ग काढून वाळू उपसा परवानगी देण्याची मागणी केली जात आहे.

Related Stories

105 कोटींच्या दंडवसुलीसाठी मेघा इंजीनियरिंगचे निढळमध्ये खाते सील

Patil_p

महावितरण अधीक्षक अभियंत्यांकडून सीपीआरचे ऑडीट

Archana Banage

जिह्यात चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यावर भर

Patil_p

सातारा पालिकेत बजेटच्या बैठका सुरु

Amit Kulkarni

आणि बुकिंग होतयं फुल्ल

Patil_p

बँका बंद

Patil_p