Tarun Bharat

महाराष्ट्र : 159 पोलिसांना कोरोनाची बाधा; एकूण आकडा 21,311 वर

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 159 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. तर आतापर्यंत 21 हजार 311 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 222 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 21,311 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 2326 पोलीस अधिकारी आणि 18,985 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 17 हजार 434 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 1848 पोलीस अधिकारी आणि 15,586 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

  • 3655 पोलिसांवर उपचार सुरु 


सद्यस्थितीत राज्यात 3655 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 455 पोलीस अधिकारी आणि 3200 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 222 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 23 पोलीस ऑफिसर आणि 199 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

Related Stories

बोगदा बंद झाल्याने द्राविडी प्राणायाम सुरू

Patil_p

बैठकीस कोणीच हजर नाही असे म्हणणे चुकीचे : खा. धैर्यशिल माने

Abhijeet Khandekar

तौत्के चक्रीवादळ : उपमुख्यमंत्र्यांकडून मंत्रालय नियंत्रण कक्षातून आढावा

Rohan_P

संभाव्य पुराच्या काळात वीज खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी : करवीर शिवसेना

Abhijeet Shinde

मुंबई विमानतळावर NCB ची मोठी कारवाई; ३ किलो ड्रग्ज जप्त

Abhijeet Shinde

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P
error: Content is protected !!