Tarun Bharat

महारूगडेवाडीसह परिसर लॉकडाऊन

कराड तालुक्यात दुसरा रूग्ण आढळल्याने खळबळ

वार्ताहर\ उंडाळे

महारुगडे वाडी (ता. कराड) येथील कृष्णा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा कोरोनाचा रिपोर्ट  पॉझिटिव्ह आल्याने  गावासह तालुक्यात  एकच खळबळ उडाली आहे. तांबवे या गावानंतर कराड तालुक्यातील दक्षिण भागातील डोंगरी भागात असणाऱया खेडेगावात हा रुग्ण सापडल्याने कोरोनाचे लोण आता शहरी भागातून ग्रामीण भागात वाढत असल्याचे दिसत आहे. प्रशासनाने महारुगडेवाडी गावाकडे धाव घेत उपाययोजना करून नागरिकांना घरी राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

कराड तालुक्यातील महारुगडे वाडी येथील एक व्यक्ती मुंबई येथे वास्तव्यास आहे. कोरोना  विषाणूचा संसर्ग वाढत असताना 28 मार्च रोजी ही व्यक्ती आपल्या जावयाच्या रिक्षांमधून मुलीसह दोन नातवंडांबरोबर पाच तास प्रवास करून गावाकडे आली होती. त्यानंतर त्यांना त्रास होत असल्याने ही व्यक्ती जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात गेली असता या व्यक्तीची लक्षणे कोरोनासदृश असल्याने खासगी डॉक्टरांनी त्यांना तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सदर व्यक्तीने दुसऱया एका खाजगी रुग्णालयात जाऊन तात्पुरती उपचार घेतले. तरीही त्रास वाढत असल्याने मागील दोन दिवसांपूर्वी ही व्यक्ती कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल झाली. त्याच्या घशातील श्रावाचे नमुने पुणे येथे पाठवले असता आज सकाळी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यामुळे प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली.

ही माहिती महारुगडे वाडी गावासह परिसरात वाऱयासारखी पसरली. त्यानंतर गावासह पूर्ण परिसर बंद  करण्यात आला. तसेच गावच्या हद्दी सील करण्यात आल्या आहेत. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वच नागरिकांना तपासणीसाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल  करण्यात आले  आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आलेली व्यक्ती आपल्या जावयासोबत गावाकडे रिक्षाने आली होती. हा जावई गावाशेजारीलच जिंती (ता. कराड) येथील असून या गावातही भीतीचे  वातावरण पसरले आहे. कोरोना बाधित रुग्ण हा मुंबई येथे मच्छी मार्केटमध्ये काम करतो. मच्छी मार्केट बंद असल्याने तो आपला जावई मुलगी व दोन नातवंडासह गावी आईकडे आला होता. तर त्याची पत्नी व मुलगा हे मुंबई येथेच आहेत.

उंडाळे खोरे लॉकडाऊन

महारूगडेवाडी गाव उंडाळेलगत असल्याने या विभागातील सात ते आठ गावे 100 टक्के लॉकडाऊन करण्यात आली. उंडाळे बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवेतील दुकानेही बंद करण्यात आली. उंडाळे ग्रामीण रूग्णालय वगळता अन्य दवाखाने बंद आहेत. जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील यांनी महारूगडेवाडीस भेट देऊन ग्रामस्थांना धीर दिला.

Related Stories

महिला सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ, एकावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

datta jadhav

OBC आरक्षण : मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरेंची अनुपस्थिती

Archana Banage

मराठा क्रांती मोर्चाची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक

Archana Banage

आनंद तेलतुंबडेंची तळोजा कारागृहातून जामिनावर सुटका

Archana Banage

तलवारीने केक कापून वाढदिवस, ६ जणांवर गुन्हा

Archana Banage

पन्नास लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचे कवच

datta jadhav