आलिशान जीवन पाहून दंग होतात लोक
भेटण्यासाठी येतात पाहुणे
एका मांजराचे जीवन पाहून लोक दंग होतात आणि अनेक लोक तर या मांजराला जगातील सर्वात श्रीमंत मांजर देखील मानतात. इंग्लंडमध्ये राहणाऱया या मांजराचे प्रस्थ एखाद्या महाराणीपेक्षा कमी नाही.
लंडनच्या हाइड पार्कमध्ये द लँसबरो हॉटेलमध्ये हे मांजर अत्यंत लोकप्रिय आहे. हॉटेल आतून बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही अधिक सुंदर आणि भव्य आहे. हॉटेलमध्ये एक रुम बुक करण्यासाठी 26 लाख रुपयापर्यंत रक्कम खर्च करावी लागते. या हॉटेलची एक महाराणी असून जिला ‘द लेडी ऑफ द लँसबरो’ या नावाने कर्मचारी ये-जा करणारे लोक म्हणून हाक मारतात. ही महाराणी महिला नसून एक मांजर आहे.


महाराणीचे मांजराला नाव
लँसबरो हॉटेलची कंपनी ओएटकर कलेक्शन हॉटेलने या मांजराला इंग्लंडच्या एका ब्रीडरकडून खरेदी केले होते. काही वर्षांमध्ये हे मांजर सर्वांची आवडती ठरली असून लोक तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. चालू महिन्यात हे मांजर 3 वर्षांचे होणार आहे. याचे नाव देखील महाराणीच्या नावावर ठेवण्यात आले आहे. बालपणी महाराणीचे नाव लिलीबेट होते. आता हेच नाव मांजराला देखील देण्यात आले आहे.
कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य
मांजराला हॉटेलच्या कुठल्याही कोपऱयात जाण्याचे स्वातंत्र्य आहे. मांजर अत्यंत आरामपणे पूर्ण हॉटेलमध्ये फिरते. परंतु काही पाहुण्यांचा यावर आक्षेप असतो. काही आक्षेपांमुळे मांजराला हॉटेलच्या मुख्य रेस्टॉरंटमध्ये जाता येत नाही. हे हॉटेल पेट प्रेंडली असून अनेक लोक स्वतःच्या पाळीव प्राण्यांना सोबत घेऊन येतात. लिलीबेटची या प्राण्यांसोबत चांगली गट्टी जमते. या मांजराला केवळ प्रेंच बुलडॉग जातीचे श्वान आवडत नाहीत. या मांजरासाठी एक व्हॉट्सऍप ग्रूप तयार करण्यात आला असून याद्वारे ती कुठे आहे हे त्वरित सांगण्यात येते. अनेक पाहुणे तर या मांजराला भेटण्यासाठी येथे येत असतात.