Tarun Bharat

‘महाविकास’ची सरशी, राजापुरात सेनेला ठेंगा

Advertisements

प्रतिनिधी/ चिपळूण

जिह्यात विविध नगर परिषद व नगर पंचायतींच्या विषय समित्यांची निवडणूक सोमवारी झाली. राजापुरात सत्ताधारी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाशी हातमिळवणी करून शिवसेनेला भूईसपाट केले. अन्य ठिकाणी मात्र अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीने आपला वरचष्मा राखण्यात यश मिळवले आहे.

  चिपळूण नगर परिषदेसह काही ठिकाणी ईच्छूकांमध्ये समेट घडवून आणण्यात आघाडीला यश आले. शिवाय भाजपाने मैदानात प्रवेशच न केल्याने फारसा संघर्ष न होताच या निवडणुका झाल्या. बहुतांश ठिकाणी जुन्या मंडळींनाच पुन्हा स्थान देण्यात आले असले तरी काही नव्या चेहऱयांनाही संधी मिळाली आहे.

राजापूरात शिवसेनेच्या हाती भोपळा

राजापूर नगर परिषदेच्या सोमवारी झालेल्या स्थायी व विषय समित्यांच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसने राष्ट्रवादी व भाजपाला हाताशी धरून बांधकाम, आरोग्य व पाणी पूरवठा समिती स्वतःकडे ठेवल्या आहेत. याचवेळी महिला व बालकल्याण समितीची निवडणूक रद्द करण्याची खेळी करून शिवसेनेला सभापती पदापासून वंचित ठेवले आहे.

 चिपळुणात यंग ब्रिगेड, भाजपाची नांगी

चिपळूण नगर परिषदेत अपेक्षेप्रमाणे सर्व समित्यांवर महाविकास आघाडीने कब्जा मिळवला. शेवटपर्यंत धुसफूस सुरू असताना महाविकास आघाडीला काँग्रेसने हात दिला. आपल्या वाटय़ाचे स्थायी समिती सदस्यपद अपक्षाला बहाल करतानाच महिला व बालविकास समितीही सेनेला सोडली. याचवेळी भाजपने अर्जही न करता सपशेल नांगी टाकल्याने सोमवारी नगर परिषदेच्या विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली. सर्व समित्यांच्या सभापतीपदी तरूणांना संधी देण्यात आली आहे.

खेडमध्ये सबकुछ शिवसेना

खेड नगर परिषदेच्या विषय समितीच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने चारही समित्या ताब्यात घेतल्या. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदाची लॉटरीही शिवसेनेच्याच पारडय़ात पडली.

दापोलीत सेना-काँग्रेस बिनविरोध

दापोली नगरपंचायत विषय समित्यांच्या निवडणुकीत विरोधकांकडून एकही अर्ज न आल्याने सर्व समित्यांवर सत्ताधारी शिवसेना व काँग्रेस पक्षाचे सदस्य सभापती म्हणून बिनविरोध विराजमान झाले.

रत्नागिरीत शिवसेनेचाच वरचष्मा

रत्नागिरी नगर परिषदेची विषय समिती सभापती आणि स्थायी समिती निवडणूक सत्ताधारी शिवसेनेतील इच्छुकांच्या भाऊगर्दीतही बिनविरोध पार पडली. विरोधी भाजपाकडून एकही उमेदवारी अर्ज सादर न झाल्याने अर्ज भरलेल्या पाचही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. त्यात राष्ट्रवादीतून शिवसेनावासी झालेल्या दोघांची वर्णी लागली. 

Related Stories

राज्यातील राजकीय सत्तानाट्य संपलं, बहुमताचा डाव शिंदे-भाजप गटाने जिंकला

Rahul Gadkar

प्रलंबित मागण्यांसाठी चतुर्थश्रेणी कर्मचाऱयांचा संप

Patil_p

बांद्यात तपासणी नाक्यावर 40 हजाराची दारू जप्त

NIKHIL_N

रेड झोनमधील ट्रक चालकांचा बांद्यात मुक्त संचार

NIKHIL_N

मालवणातील शिबिरात ४२ जणांचे रक्तदान

NIKHIL_N

गस्तीनौका लवकरच मत्स्य विभागाच्या ताब्यात

Patil_p
error: Content is protected !!