मुंबई / ऑनलाईन टीम
कोरोनाच्या उपचारांमधये महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलेच राजकारण तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरू झाली आहे. आता या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसेनेही उडी घेतली आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा साठा केवळ भाजपकडेच नव्हे तर महाविकासआघाडीच्या नेत्यांकडेही आहे, असा आरोप मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केले आहे.
रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा साठा मविआ आमदारांकडेही आहे. काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी त्याचे वाटपही करत आहेत. नवाब मलिक यांनी याबाबतही जरा बोलावे. तुमचे राजकारण बंद करा, जनतेचा जीव महत्त्वाचा आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होणे गरजेचे आहे, असे अखिल चित्रे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

