Tarun Bharat

महाविकास आघाडीला धक्का; सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतमोजणी होत असून आता निकाल समोर येत आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणानंतर ही निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे. या हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले. यांनतर जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. अत्यंत चुरशीची मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत राणेंनी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला असून जिल्हा बँकेवर ताबा मिळविला आहे.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु असून भाजपच्या सिद्धिविनायक सहकार पॅनलने दहाहून अधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

सहकारी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी संस्था मतदारसंघामध्ये भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या सुरेश दळवी यांचा पराभव केला आहे. तर सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघात भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली पराभूत झाले असून महाविकास आघाडीचे सुशांत नाईक विजयी झाले आहेत. सुशांत नाईक हे आमदार वैभव नाईक यांचे भाऊ असल्याने याठिकाणी भाजपला धक्का बसला आहे.

यावेळी कणकवलीमधून सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई या दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाली होती. समसमान मतं पडल्यानंतर चिट्ठी टाकून आलेल्या निकालात सतीश सावंत पराभूत झाले. सतीश सावंत हे जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष होते. तर औद्योगिक संस्था मजूर संस्था जंगल कामगार संस्था मोटार वाहतूक संस्था मतदारसंघातून भाजपाचे गजानन गावडे विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या लक्ष्मण आंगणे यांचा पराभव केला आहे.

.

Related Stories

राहुल गांधींना तात्काळ अध्यक्ष करा; दिल्ली काँग्रेसचा ठराव

Abhijeet Shinde

Chiplun Flood : नागरिकांना एअरलिफ्ट करण्यासाठी प्रयत्न सुरु – विजय वडेट्टीवार

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात 729 नवे रुग्ण

Rohan_P

शिंदे गटात जाणाऱ्या 12 संभाव्य खासदारांची नावं आली समोर

datta jadhav

सोलापूर : कोरोनाने १० जणांचा बळी, शहरात १४४ तर ग्रामीणमध्ये १५२ बाधित रुग्ण

Abhijeet Shinde

ईपीएफचा व्याजदर 8.5 टक्केच राहणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!