Tarun Bharat

“महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकणार”

Advertisements

बारामती/प्रतिनिधी

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकणार नाही असं वक्तव्य वारंवार विरोधी पक्षकाडून केलं जात आहे. परंतु महाविकास आघाडी सरकार कडून मात्र हे सरकार पाच वर्षे टिकणार असं म्हंटल आहे. दरम्यान, आज शरद पवार दौऱ्यावर असताना त्यांनी महाविकास आघाडी सरकार टिकण्याविषयी वक्तव्य केलं आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सरकार चालवताना काही प्रश्न जरूर निर्माण होतात. महाविकास अघाडीची निर्मिती होतानाच असे प्रश्न सोडवण्यासाठी एक यंत्रणा असावी असा निर्णय झाला होता. त्याची जबाबदारी देखील तिन्ही पक्षांच्या काही सहकाऱ्यांकडे सोपवली आहे. कोणत्याही महत्वाच्या धोरणात्मक प्रश्नासाठी हे सहकारी एकत्र येतात आणि त्यावर निर्णय घेत असतात. त्यामुळं हे सरकार अत्यंत व्यवस्थित चाललं आहे. हे सरकार पाच वर्षे टिकेल याबद्दल शंका नाही, असे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

राजकारणात प्रत्येक पक्ष आपआपली वैयक्तिक संघटनात्मक ताकद वाढवत असतो. यामध्ये काही गैर नाही. शिवसेना असो, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी असो प्रत्येक पसंखला संघटना वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. याबद्दल आमच्यात सामंजस्य असून कुठेही मतभेद नाही’ असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मागील काही दिवसांपासून पदोन्नती आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरबुरी वाढल्या होत्या. त्यातच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे भाजप शिवसेना युतीची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी रविवारी शरद पवार माध्यमांशी बोलत होते.

Related Stories

नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Abhijeet Shinde

कोल्हापूर : हाजी अस्लम सय्यद यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

लसीकरणाचा शिवधनुष्य पेलणाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद : चंद्रकांत पाटील

Rohan_P

मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका, त्या नाराज नाहीत – देवेंद्र फडणवीस

Abhijeet Shinde

धमकी देऊ नका.. एकच थापड देऊ, पुन्हा कधीच उठणार नाही

Abhijeet Shinde

कोल्हापुरात ‘पबजी’ चा एक किल, तरुणानं संपवलं आयुष्य

Archana Banage
error: Content is protected !!