Tarun Bharat

महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल ; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

Advertisements

मुंबई \ ऑनलाईन टीम

इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी सेनेने एक उमेदवार दिला नाही, बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांना शब्द दिला होता तो पाळला हा इतिहास आहे. शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे. त्यामुळे हे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, आपण महाविकास आघाडीचा पर्याय दिला, लोकांनी तो पर्याय स्वीकारला. आजच्या घडीला महाविकास आघाडी सरकार उत्तमरित्या काम करत आहे. सरकार झाल्यानंतर किती दिवस टिकणार अशी चर्चा सुरु होती अशी आठवण करुन देताना हे सरकार टीकेल आणि पाच वर्ष टीकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच हे सरकार नुसतंच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचं देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचं का करेल याबाबत शंका नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.

आजच्या दिवशी 22 वर्षांपूर्वी संघटना उभी करण्याची भूमिका स्वीकारली, ती कितपत योग्य होती याचा आढावा घ्यायचा आजचा दिवस आहे असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. सत्ता ही केंद्रीत व्हायला नको. तसं झालं तर ती भ्रष्ट होते. सत्ता ही अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला आपण या सत्तेचा भाग असल्याची जाणीव झाली पाहिजे. आज राष्ट्रवादीचा प्रवास बघता, पक्षाने महाराष्ट्रात नेतृत्वाची फळी निर्माण केली आहे. सत्ता गेल्यानंतर काही लोक गेले पण नवीन नेतृत्व तयार झाल्याचं पाहण्यास मिळाले. आजचं मंत्रिमंडळ बघितलं तर अनेक सहकारी जबाबदारी पेलत आहे. त्यांचे कर्तृत्व या आधी दिसलं नव्हतं. कोरोना काळात राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे यांनी केलेल्या कामाचे कौतुक देखील शरद पवार यांनी केले. राजेंद्र शिंगणे, टोपे अशा प्रत्येकाने आपली जबाबादारी उत्तपणे पार पडली. महाराष्ट्राला नेतृत्वाची फळी देऊन विश्वास देण्याचं काम राष्ट्रवादीने केलं. राजकारणा नव्या पिढीला प्रोत्साहन आणि संधी दिली पाहिजे. उत्तम काम करत असेल तर पाठीशी उभं राहिलं पाहिजे, असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

Related Stories

५ हजाराची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

Abhijeet Shinde

राशिवडेत परप्रांतीय महिलेची आत्महत्या

Abhijeet Shinde

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत- नाना पटोले

Abhijeet Shinde

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन!

Abhijeet Shinde

लवकरच बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार

Sumit Tambekar

गोडोली तळय़ाचा परिसर उजाळला

Patil_p
error: Content is protected !!