Tarun Bharat

मोठी बातमी! महाविकास आणि स्वाभिमानीचे संबंध संपले – राजू शेट्टी

कोल्हापूर/प्रतिनिधी

केंद्र आणि राज्यसरकार शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेत आहे. त्यामुळे आजपासून महाविकास आघाडी आणि स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संबंध संपले. असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी जाहीर केले. ते हातकणंगले तालुक्यातील चोकाक येथे झालेल्या राज्य कार्यकारणी बैठकीत बोलत होते.

काँग्रेसचे काय चाललंय कळत नाही.
काँग्रेसचे धोरण बदललं आहे की इथले नेते वरिष्ठ नेत्यांचं ऐकत नाहीत. त्याबाबत मी याबाबत सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ही पत्र लिहिले होते. महाविकास आघाडी मधील तीन ही पक्षाची राज्यातील भूमिका वेगळी आहे. दिल्लीतील भूमिका वेगळी आहे. असे शेट्टी म्हणाले.

महाविकास आघाडीचे हे आपलं सरकार आहे. पण दीड वर्ष राज्यात ऊस दर नियंत्रण समिती नव्हती. नंतर कारखानदारासमोर दबून राहील अशी समिती नेमली गेली. असा आरोप शेट्टी यांनी केला. शेतमजुरांना कल्याणकारी मंडळ तयार करावे. सर्वच पिकांना हमीभाव मिळावा असे ठराव येत्या 1 मे च्या गाव सभेत ठराव करायचा आहे.हे ठराव घेऊन राष्ट्रपतींना भेटणार आहे. आता पर्यंत संसदेत खासदारांच्या मागणीवरून कायदे केले आता शेतकऱ्यांना मागणीवरून कायदे करायला भाग पाडू,असा इशारा शेट्टी यांनी दिला.

शेतीला दिवसा 10 तास वीज मिळावी असा देखील ठराव करायचा आहे. 15 एप्रिल पासून बळीराजा हुंकार यात्रा काढणार. तसेच प्रत्येक जिल्ह्यात ठरावा बाबत जागृती करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या निवडणूकाचा केंद्र आणि राज्य सरकारने पोर खेळ करून टाकला आहे. एकमेकावर कुरघोड्या करत आरक्षण संपवून टाकलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण आहेत तशी दिली पाहिजेत. केंद्र आणि राज्य सरकार ला विनंती आहे तुमच दळभद्री राजकारण बंद करून आरक्षण पूर्ववत करा अन्यथा किमंत मोजावी लागेल. असा इशारा शेट्टी यांनी दिला.

महाविकास आघाडी सोबत संबंध ठेवायचे की नाही याचा निर्णय आज घ्यायचा आहे. आज सकाळ पासून अनेकांनी संतप्त मनोगत व्यक्त केली. चळवळ मजबूत करता यावी म्हणून निवडणुका लढवल्या. तेव्हा ही शेतकऱ्याच्या पदरात काय पडणार आहे, याचा विचार नेहमी केला. असेही शेट्टी म्हणाले.

पूरग्रस्त निधी बाबत मोठा विश्वासघात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा झाला. महाराष्ट्रात या आदी जसे साखर घोटाळे झाले तर जल विद्यूत केंद्रा बाबत होणार आहे. असा विश्वासघात वारंवार होणार असेल, तर या आघाडी सोबत राहायचं का प्रश्न आहे. मागे फिरायचं म्हटलं तर ज्यांनी 800 शेतकऱ्यांचा बळी घेतला त्यांना पाठिंबा द्यायचा ? शेतकरी विरोधी भूमिका घेतल्या त्यांना मदत करायची का? असा सवाल शेट्टी यांनी केला. चळवळ मजबूत करण्यासाठी राजकारण.आमच्या सोयीसाठी राजकारण हे आपलं धोरण आहे. होय आम्ही राजकीय भूमिका बदलल्या पण त्यात ही शेतजाऱ्यांच्या पदरात चार पैसे पडतील हा हेतू आहे.

Related Stories

दिघंचीत नारळाच्या झाडावर वीज पडली; जीवितहानी नाही

Archana Banage

कणेरी येथे प्रदूषण मुक्त दीपोत्सव साजरा

Archana Banage

राजधानी दिल्लीत जाणवले भूकंपाचे धक्के 

Tousif Mujawar

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आज 2 तासांचा ब्लॉक

datta jadhav

‘वंदे मातरम्’ आदेशावरून मुनगंटीवारांचा यूटर्न

Archana Banage

‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या प्रभावातही शहरी भागात वीजपुरवठा सुरळीत

Tousif Mujawar