Tarun Bharat

महावितरणकडून राधानगरी धरणाचा वीज पुरवठा खंडित

धरणावरील सीसीटीव्ही यंत्रणा बंद; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर


राधानगरी / प्रतिनिधी

राधानगरी महावितरणच्या कनिष्ठ शाखा कार्यालयाकडून राधानगरी धरणाचा वीज पुरवठा खंडित केल्याने,धरणावरील सीसीटीव्हीसह सर्व यंत्रणा बंद झाला आहे. यामुळे राधानगरी धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महावितरणने थकीत विजबिलाच्या वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे धरणावरील सीसीटीव्हीची प्रकाश व्यवस्था बंद झाली आहे. यामुळे राधानगरी धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत पाटबंधारे विभागाशी संपर्क केला असता महावितरणने नोटीस अथवा कोणतीही पूर्व सूचना न देता वीज खंडित केल्याचं सांगितले जात आहे. पाठबंधारे विभागाने मात्र आमचं वीज बिल कधीच थकीत राहत नाही. तांत्रिक कारणामुळे एकच बिल थकीत राहिलं असतानाही महावितरणने वीज पुरवठा खंडित केल्याचं सांगितले आहे.

Related Stories

महाराष्ट्रात येत्या रविवारपर्यंत पावसाचा जोर कायम

Archana Banage

ईडी कार्यालयासमोर ‘भाजप प्रदेश कार्यालय’ म्हणून शिवसैनिकांची बॅनरबाजी

Tousif Mujawar

चंद्रभागेवरील भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू

Omkar B

…मी कधी पाठीमध्ये खंजीर खुपसला नाही : एकनाथ खडसे

Tousif Mujawar

Sangli; नवजात बाळाच्या खूनप्रकरणी मातेस जन्मठेप

Abhijeet Khandekar

कसब्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; कौल कुणाला?

datta jadhav