Tarun Bharat

महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता लाच घेताना जेरबंद

प्रतिनिधी / कोल्हापूर

घरगुती सोलर सिस्टीम बसविण्यास परवानगी देण्यासाठी 6 हजारांची लाच स्विकारणाऱया महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून जेरबंद केले. आबासाहेब परशराम मांडके (वय 52 रा. आयोध्या अपार्टमेंट, एस. टी. कॉलनजवळ, ताराबाई पार्क) असे अटक केलेल्या अभियंत्याचे नांव आहे. 

तक्रारदार यांच्या वडीलांचे सोलर सिस्टीम विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानातून एका गिऱहाईकाने घरगुती 10 किलो वॅट सोलर सिस्टीमची खरेदी केली होती. घरगुती सोलर सिस्टीम बसविणे तसेच त्यातून तयार होणारी विज महावितरण कार्यालयास देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची परवानगी आवश्यक असते. यासाठी तक्रारदारांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता आबासाहेब मांडके याच्याकडे गुरुवार (5 नोव्हेंबर) रोजी रितसर अर्ज केला होता.  मांडके यांनी 1 किलो वॅटसाठी 600 रुपये प्रमाणे 10 किलो वॅटचे 6 हजार रुपये द्यावे लागतील. सदरची रक्कम दिल्यानंतरच तुमचे काम मंजुर केले जाईल नाहीतर परवानगी देणार नाही असे सांगितले. यानंतर तक्रारदाराने शुक्रवारी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून याबाबतची रितसर तक्रार दाखल केली.  

लाचलुचपत विभागाच्या पथकाने शुक्रवारी सकाळी नागाळा पार्क येथील एम.एस. ई. बी. उत्तर विभाग कार्यालयामध्ये सापळा रचला. तक्रारदाराने मांडके यांची भेट घेतली. यावेळी मांडके यांनी 6 हजार रुपये लाचेची रक्कम तात्काळ घेवून येण्यास सांगून सदरची रक्कम स्विकारत असताना लाचलुचपत विभागाने मांडके यांना जेरबंद केले.

लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत, सहाय्यक फौजदार शाम बुचडे, पोलीस कॉन्स्टेबल अजय चव्हाण, मयुर देसाई, रुपेश माने, संदीप पडवळ, विष्णू गुरव यांनी ही कारवाई केली. 

शपथ ग्रहण विधीचा विसर 

लाचलुचपत विभागाच्या वतीने 27 ऑक्टोंबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीमध्ये सर्व शासकीय कार्यालयामध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाअंतर्गत भ्रष्टाचार करणार नाही अशी शपथ घेण्यात आली होती. महावितरण कार्यालयामध्येही अशी शपथ घेण्यात आली होती. मात्र सप्ताह संपल्यानंतर दोनच दिवसांत महावितरण कार्यालयाचे वर्ग 1 अधिकारीच लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले. दोनच दिवसांत मी भ्रष्टाचार करणार नाही… मी लाच स्विकारणार नाही या शपथेचा अधिकाऱयांचा विसर पडल्याचे या कारवाईवरुन दिसले.

पाच वर्ग 1 चे अधिकारी जेरबंद

लाचलुचपत विभागाने 10 महिन्यात 22 यशस्वी सापळ्यांचे रचले. यामध्ये 5 वर्ग 1 च्या अधिकाऱयांना लाचलुचपत विभागाने जेरबंद केले. वैद्यकीय अधिक्षक, जिल्हा परिषद बांधकाम उप अभियंता, मंडळ अधिकारी, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, जलसंधारण अधिकारी यांचा समावेश आहे.

Related Stories

..अन्यथा मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात प्रवेश बंद

Abhijeet Khandekar

कोल्हापूरचा सर्वांगिण विकास हाच प्रमुख अजेंडा खा.धनंजय महाडिक यांची माहिती

Abhijeet Khandekar

चुना मागण्यावरून तुंबळ हाणामारी, एकाच भोसकून खून

Archana Banage

कोगे येथे अतिवृष्टीमुळे घराची झाली पडझड; ७० हजारचे नुकसान

Abhijeet Khandekar

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी सदैव खुले

Archana Banage

‘एफआरपी’ च्या तुकडय़ांसाठी ‘करारपत्र’

Archana Banage