Tarun Bharat

महावितरणचा कर्मचारी लाच घेताना अटक

प्रतिनिधी/ फलटण

फलटण शहरातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा प्रधान तंत्रज्ञ (वायरमन) कार्तिकीस्वामी तुकाराम गुरव याला 1 हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असल्याची घटना घडली आहे.सलग तिस्रया वर्षी महावितरणच्या कर्मचायास लाच घेताना अटक झाल्याने फलटण तालुक्यासह सातारा जिह्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी दिलेली माहितीनुसार, मंगळवार दिनांक 8 मार्च रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कार्यालय फलटण येथील अर्बन शाखा नं -1 फलटण याठिकाणी प्रधान तंत्रज्ञ (वायरमन) पदावर असणाया कार्तिकीस्वामी तुकाराम गुरव (मूळ रा. मु.पो.पिंगुरी, ता.पुरंदर, जि.पुणे तर सध्या रा.शासकीय निवास स्थान एम.एस.ई.बी कॉलनी फलटण) यांनी संबंधित तक्रारदार यांचा जुना मिटर काढून नविन मिटर जोडणीसाठी 1 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. संबंधित वायरमन तक्रारदार यांच्याकडून 1 हजार रुपये लाच  फलटण शहरातील हॉटेल आर्यमान येथे स्विकारल्यानंतर त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी रंगेहाथ पकडले. सबधित महावितरण कर्मचायाच्या विरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम खाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

आहे.लाच मागणी संदर्भात तक्रारी असल्यास पोलिस उपअधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंध विभाग, सदर बझार, सातारा येथे अथवा कार्यालय दूरध्वनी क्रमांक 02166-238138 तसेच 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्यावतीने करण्यात आले आहे

Related Stories

इचलकरंजीकरांच्या चिंतेत भर; आणखी ४ पॉझिटिव्ह

Archana Banage

कोरोना संदर्भात राज्यात एकूण १ लाख १० हजार गुन्हे दाखल

Archana Banage

इन्स्पायर अवॉर्ड नामांकनात कोल्हापूर विभागात सातारा प्रथम

Omkar B

बाधित वाढ निम्म्याने कमी

datta jadhav

मोदींना हरवणे येड्या गबाळ्याचे काम नाही…

datta jadhav

पेठ वडगाव : वडगाव बाजार समितीचा जनावरांचा बाजार बंद करण्यासाठी पालिकेचे पत्र

Archana Banage
error: Content is protected !!