Tarun Bharat

महावितरणच्या कंत्राटी कामगाराच्या पैशावर डल्ला

प्रतिनिधी/ सातारा

सातारा महावितरण कंपनीच्या 1600 कंत्राटी कामगारांच्या पगारातून कपात कपात करण्यात आली. ही कपात दोन ठेकेदरांनी करून कामगारांच्या कष्टाच्या पैशांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखांनी तक्रार दिल्यानंतर संबंधित तक्रारीवर तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आला. या प्रकरणात सोमनाथ हंबीरराव गोडसे (रा. फॉरेस्ट कॉलनी सातारा), प्रथमेश प्रमोद जाधव (रा. वेचले ता. सातारा) असे गुन्हा दाखल केलेल्या ठेकेदारांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेला मोठे धागेदोरे सापडल्याने या ठेकेदरांवर फसवणूक व खोटी कागदपत्रे करण्यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे.

 सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था आहे. त्या संस्थेला दोन वर्षापुर्वी जिह्यात कंत्राटी कामगार सप्लाय करण्याचे टेंडर मिळाले हेते. जिह्यात हे कंत्राटी कामगार सप्लाय करण्यापाठीमागे प्रति कामगार 115 रूपये महाराष्ट्र शासन किंवा महावितरण त्यांना कमिशन देत होते. परंतु ते कमिशन सोडून हे ठेकेदार प्रत्येक कामगाराच्या खात्यातून 1 हजार 100 रूपये राणा ऍग्रोटेक कंपनी खात्यावर वर्ग करत होते. हे पैसे सोमनाथ हंबीरराव गोडसे व त्याची कोर टीम करत होती. सुरूवातीला हे पैसे रोख स्वरूपात घेतले जात होते. परंतु कामगारांची संख्या जास्त असल्याने रोख व्यवहार करणे यांना शक्य होत नव्हते. यामुळे त्यानी राणा ऍग्रोटेक नावाची बोगस कंपनी तयार केली. ही कंपनी कार्यरत नसून फक्त खात्यावरील पैसे वर्ग करून घेण्यापुरते हीच काम सुरू होते. यांच्यामध्ये प्रति महिना दीड हजार कामगारांचे दीड लाख रूपये जमा होत होते. असा हा खेळ गेल्या चार पाच वर्षापासून सूरू आहे. जो कामगार यांच्या विरोधात जाईल. पैसे कसले घेता असा प्रश्न विचारत होता. त्यांना कामावरून काढून टाकत होते. या प्रकाराला वाचा फोडण्यासाठी काही कामगारांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन सुभाष मोहिते यांच्याकडे केली. हे प्रकरण गंभीर असून यामध्ये कोटय़ावधी रूपयांचा घोटाळा आहे. यांची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षक बन्सल यांच्याकडे करण्यात आली. त्यानुसार पोलीस अधीक्षक बन्सल यांनी 10 दिवसात तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. एलसीबीने तपास करून अहवाल सादर करताच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Related Stories

महाबळेश्वर तालुक्यात वीज कोसळली, दोन गंभीर जखमी

Archana Banage

”तुम्ही सांगाल ते करायला न्यायदेवता म्हणजे सीबीआय, ईडी नाही”

Archana Banage

लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत विचार सुरू : मुख्यमंत्री

Tousif Mujawar

सातारा पोलीस दलातील कवयित्री संगीता माने यांच्या लावणीचे ध्वनीमुद्रण पूर्ण

Patil_p

‘तो’ विषय महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही

datta jadhav

सातारा : 485.90 कोटींच्या जिल्हा नियोजनाचा प्रारुप आराखडा मंजूर

datta jadhav