Tarun Bharat

महाविद्यालयांच्या परीक्षा रद्द

Advertisements

लॉकडाऊनमुळे गोवा विद्यापीठाचा निर्णय

प्रतिनिधी / पणजी

गोवा विद्यापीठाने आपल्या अंतर्गत येणाऱया सर्व महाविद्यालयांच्या शैक्षणिक वर्ष 2019-20 साठीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय काल सोमवारी घेतला आहे. त्यानुसार प्रथम व दुसऱया वर्षाच्या बीए, बीएससी, होम सायन्स, बीकॉम, बीबीए, बीसीए, बीएसडब्ल्यू या शाखांच्या नियमित विद्यार्थ्यांची सेमिस्टर एंड परीक्षा (एसईई) न घेण्याचा निर्णय घेणयात आला आहे. त्याचप्रमाणे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष बीएससी बीएड, बीएबीएडच्याही परीक्षा घेण्यात येणार नाही.

 गोवा विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात, अशी याचिका काही विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि विद्यापीठाचे कुलगुरूंकडे केली होती. या याचिकेवर सामाजिक माध्यमांद्वारे सुमारे 10 हजार सह्या केल्या होत्या. लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी मिळालेली नाही. काहीजणांना अभ्यासाचे नोटस् सुद्धा तयार करण्याची संधी मिळालेली नाही. प्राध्यापकांशी चर्चा सुद्धा करता आली नाही अशा परिस्थितीत परीक्षा घेणे अन्यायकारक होणार आहे, असे त्यात म्हटले होते.

Related Stories

शापोरा वासियांचा पाणी पुरवठा खात्यावर मोर्चा

Omkar B

बाणस्तारी भागात चोवीस तास सुरळीत वीज पुरवठा-मंत्री गोविंद गावडे

Amit Kulkarni

काणकोणच्या 5 पंचायतींत सरपंच, उपसरपंच निवड बिनविरोध होणार

Patil_p

विद्यार्थ्यांनी दिलेल्या राख्या सीमेवर जाऊन सैनिकांना बांधणार

Amit Kulkarni

वादळामुळे ऑर्किड लागवडीचे 8 लाखांचे नुकसान

Amit Kulkarni

सावर्डेत एकाची आत्महत्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!