प्रतिनिधी / वारणानगर
महाविद्यालयीन युवतीची छेड काढली म्हणून मनपाडळे (ता.हातकलंगले) येथील ओंकार जंबा माने याच्या विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या बाबत पीडित युवतीच्या आईने कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती नुसार यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात शिकत असलेली पीडित युवती सकाळी महाविद्यालयात आली असताना महाविद्यालयाच्या गेट समोर तिचा हात धरून तू माझ्याबरोबर चल असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. ही गोष्ट त्या युवतीने घरात सांगितल्यावर तिच्या आईने पोलीस ठाण्यात येऊन ओंकार विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास कोडोली पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल पोळ करीत आहे