Tarun Bharat

महावीर कर्णाची भूमिका साकारणार रणवीर सिंग

Advertisements

कोरोना काळात अभिनेता रणवीर सिंगचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. अलिकडेच रणवीरच्या ‘83’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यानुसार चित्रपट 4 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये वादळ घडवून आणणार आहे. तर अभिनेत्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रणवीर सिंग आता महावीर कर्णच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

वासू भगनानी यांच्या प्रॉडक्शन हाउस अंतर्गत निर्माण होणारा चित्रपट ‘सूर्यपुत्र महावीर कर्ण’मध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसून येऊ शकतो. पण अद्याप या चित्रपटाशी संबंधित कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु रणवीरने कर्णाच्या व्यक्तिरेखेसाठी होकार दर्शविल्याचे समजते. हा चित्रपट एकूण 5 भाषांमध्ये प्रदिर्शत होणार आहे. यात हिंदीसह तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेचा समावेश असणार आहे.

Related Stories

पुन्हा जमणार कार्तिक अन् साराची जोडी

Patil_p

प्लॅनेट टॅलेंटच्या यादीत गायत्री दातार

Patil_p

राशिचा बॉलिवूडमध्ये नाही गॉडफादर

Patil_p

सोनाक्षी अन् हुमा चित्रपटासाठी एकत्र

Amit Kulkarni

बाजिंद म्हणजे लढवैया, बिनधास्त आणि जिद्दी व्यक्तिमत्व

Patil_p

‘सत्यमेव जयते-2’मधून झळकणार दिव्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!