Tarun Bharat

महास्वयंम पोर्टलवर ई-मेल, आधार व मोबाईल क्रमांक लिंक करा : प्र.सहाय्यक आयुक्त आ.बा.तांबोळी

सांगली / प्रतिनिधी

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगली या कार्यालयाच्या विभागाच्या महास्वयंम पोर्टलवर नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आधार कार्ड नंबर, ई-मेल, मोबाईल नंबर लिंक करावा. अन्यथा सेवायोजन कार्ड रद्द होईल, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे प्रभारी सहाय्यक आयुक्त आ. बा. तांबोळी यांनी कळविले आहे.

ज्या उमेदवारांनी नोंदणी आधारकार्डशी लिंक केलेली नाही त्यांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरील (Home page) रोजगार (Employment) हा पर्याय निवडून नोकरी साधक (Job Seeker) हा पर्याय निवडून आपला युजर आयडी व पासवर्ड वापरून Login व्हावे व आधारनंबर या ठिकाणी आपला आधार नंबर नमुद करून कॅप्च्या (captcha) टाकून सबमिट (Submit) या बटनावर क्लिक करावे. जेणेकरून माहिती अद्ययावत होईल. अन्यथा सेवायोजन कार्ड रद्द होईल.

महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी न केलेल्यांनी नोंदणी करून ऑनलाईन जॉबफेअर, ऑनलाईन करिअर गायडन्स व इतर योजनांचा लाभ घ्यावा. याबाबत काही अडचण आल्यास 0233- 2600554 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही तांबोळी यांनी केले आहे.

नविन नाव नोंदणीसाठी पाथ – www.mahaswayam.gov.in – Home page – Employment – Job Seeker – Login.
आधार लिंक करण्याच पाथ –
www.mahaswayam.gov.in – Home page – Employment – Job Seeker – User ID – PassWord – Login – Adhar Number – Captcha.

Related Stories

सातारा शहरात कोरोनाचा उद्रेक

Patil_p

महाराष्ट्रात मागील 24 तासात 215 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

वैराग ग्रामपंचायत कार्यालयात रंगली दारू पार्टी

Archana Banage

केंद्र व राज्य शासनाचे कर्तृत्व संपल्याने जातीयवाद

Patil_p

यशवंत साखर कारखाना पूर्ण क्षमतेने चालवणार : खासदार संजयकाका पाटील

Archana Banage

कोल्हापूर : इचलकरंजीत कोरोनाने दोघांचा मृत्यू : मृतांची संख्या १६ वर

Archana Banage