Tarun Bharat

महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने दीड लाख गरजूंना मदत

ऑनलाईन टीम / पुणे :

महा एनजीओ फेडरेनच्या वतीने महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यातील दीड लाख लोकांना मदत करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात निर्माण झालेल्या कठिण परिस्थितीत गरीब व गरजू लोकांसाठी तसेच आरोग्य, नगरपालिका आणि पोलीस कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते अहोरात्र झटत आहेत. याकाळात तब्बल 75 हजार अन्नाची पाकीटे, 20 हजार शिधा संच, 20 हजार मास्क, 5 हजार फेस शिल्ड, 650 पीपीई कीट देण्यात आले. 


आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रणेते व आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांच्या आशीर्वादाने सामाजिक कार्यकर्ते शेखर मुंदडा आणि महा एनजीओ फेडरेनच्या सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली 1 हजार 500 स्वयंसेवी संस्था व कार्यकर्ते यासाठी काम करीत आहेत. पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आदीवासी भागांचा यामध्ये समावेश आहे. महा एनजीओ फेडरेनने राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले त्यात 500 रक्तदात्यांनी सहभाग घेतला. 


स्वयंसेवकांपैकी शशांक ओंबासे यांनी विशेष उल्लेखनीय कार्य केले. तसेच फेडरेशनच्या समितीतील विजय वरुडकर, राहुल पाटील, मुकुंद शिंदे, अमोल उंबरजे, वैभव मोगरेकर, भाग्यश्री साठे, गणेश बकाले, अक्षय महाराज भोसले आदींनी विशेष परिश्रम घेतले. 

Related Stories

भारतातील पहिले डार्क स्काय रिझर्व्ह

Patil_p

पानिपतवीर दमाजीराव गायकवाड यांना अनोखी मानवंदना

Tousif Mujawar

प्राचीन काळातील मगरी दोन पायावर चालणाऱ्या आणि पळणाऱ्याही

datta jadhav

बल्बात लावू आता रोपेही…

Omkar B

कधीही एकत्र न येणारे एकत्र येतायंत : राधाकृष्ण विखे-पाटील

prashant_c

कोकणच्या सुनबाई ‘मेडि क्वीन’

prashant_c