Tarun Bharat

महिंद्राची ऑनलाईन सेवा सुरु

दिल्ली : सध्या देशात तिसऱया सत्रातील लॉकडाऊन सुरु आहे, यामुळे उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी नियम व अटीच्या आधिन राहून देशभरातील उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत. परंतु यातील बहुतेक वाहन कंपन्यांनी आता आपल्या डिलर्सना ऑनलाईन प्लॅटफार्मच्या आधारे एकत्र आणत ग्राहकांसाठी ऑनलाईन सेवा सुरु केली आहे. ऑडि व मारुती सुझुकी कंपन्यांनी आपली ऑनलाईन सेवा सुरु केली असून पाठोपाठ आता महिंद्रा कंपनीनेही ऑनलाईन सेवा सुरु केली आहे.

ऑनलाईन सेवा ग्राहकांना देण्यासाठी महिंद्राने 270 पेक्षा अधिकच्या डिलर्सना आपल्या 900 पेक्षा अधिक संपर्क केंद्रांना एकत्रित जोडले आहे. यामध्ये ओन ऑनलाईन नावांनी कंपनीने एक प्लॅटफार्म सादर केले आहे. ग्राहकांना घराकडे टेस्ट ड्रायव्हींग आणि वाहनांची डिलीवरी करण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

ग्राहकांना पिझ्झा ऑर्डर करण्याच्याही कमी वेळेत आवडीचे वाहन डिलिवरी होणार आहे. चार टप्प्यांमध्ये वाहन खरेदीची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे महिंद्राचे ऑटोमोटिव्ह विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नाकरा यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

हिंदुस्थान कॉपरची वार्षिक उत्पादन वाढवण्याची योजना

Patil_p

लाँचिंगच्या चार महिन्यानंतर 100 ओला ई स्कूटरची डिलिव्हरी

Patil_p

बायोकॉनचा नफा घटला

Patil_p

रिलायन्स-आयसीआयसीआयच्या कामगिरीने बाजार तेजीत

Patil_p

नवीन वर्षात कार महागणार

Patil_p

कर्जासाठी आयबीएचा नवीन प्रस्ताव

Patil_p