Tarun Bharat

महिंद्रा ट्रक्टर्सच्या विक्रीत दुप्पट वाढ

नवी दिल्ली

 महिंद्रा आणि महिंद्राची एकूण ट्रक्टर विक्री ऑक्टोबर महिन्यात दुप्पटीने वाढून 46,558 वर राहिली आहे. मागील वर्षातील समान तिमाहीत कंपनीने 45,433 ट्रक्टर्सची विक्री केलेली आहे. रविवारी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्याची देशातील विक्री दोन टक्क्यांनी वधारुन 45,588 वर स्थिरावली आहे. जी गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये 44,646 इतकी होती.  याच दरम्यान निर्यातीचा आकडा हा 970 वर राहिला असून गेल्या ऑक्टोबरमध्ये हा आकडा 787 च्या तुलनेत 23 टक्क्यांनी अधिक राहिल्याची नोंद करण्यात आली आहे. कंपनीचे शेती उपकरण विभागाचे अध्यक्ष हेमंत सिक्का यांनी सदर विक्रीच्या आकडेवारीवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की सध्याच्या काळात किरकोळ ट्रक्टर मागणीत नेहमीपेक्षा विशेष तेजी राहिली आहे.

Related Stories

10 पैकी 4 कंपन्यांच्या बाजार भांडवलात वाढ

Patil_p

शाओमी भारतीय प्रमुखपदी अल्वीन त्से

Patil_p

निस्सान मोटर इंडियाचा उत्पादन वाढीवर भर

Patil_p

देशात 14 लाख टन साखरेचे उत्पादन

Omkar B

कार चिप टंचाईचे सत्र 2022 ला संपणार?

Patil_p

आर्थिक क्षेत्रांच्या बळकटीसाठी 9 लाख कोटीचे सहाय्य आवश्यक

Patil_p