Tarun Bharat

महिंद्रा डिझेल एक्सयुव्ही-500 बाजारात

नवी  दिल्ली :

स्थानिक ऑटोमोबाइल क्षेत्रातील वाहन निर्मिती कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा यांनी ंsबीएस- 6 श्रेणीवर आधारित ऑटोमेटीक एक्सयूव्ही-500 ही नवी कार नुकतीच सुधारीत स्वरूपात पुन्हा लॉन्च केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच या कारमध्ये सुधारणा करण्यासाठी उत्पादन बंद करण्यात आले होते. कंपनीने या कारमध्ये अनेकविध सुधारणा केल्या असून नव्याने ही गाडी बाजारात लॉन्च करण्यात आली आहे. डिझेलवर चालणाऱया या गाडीत अनेकविध वैशिष्टय़े असून किंमतीतही थोडीफार वाढ करण्यात आली असल्याचे कंपनीने सांगितले. गाडीला 2.2 लिटर एमहॉक डिझेल इंजिन असून ऑल-व्हीलड्राईव्ह सुविधाही देण्यात आली आहे. पुणे एक्स शोरूमनुसार गाडीची किंमत 15.65 लाख रुपये इतकी असणार आहे.

Related Stories

टाटाची अल्ट्रोझ डीसीए कार लाँच

Patil_p

अदानी एंटरप्रायझेसच्या निव्वळ नफ्यात घट

Patil_p

बजाज ऑटोला 23 टक्के नफा

Patil_p

मर्सिडिझकडून भारतात कार्सचे उत्पादन

Patil_p

पेटाने सेल्टॉसला विक्रीत टाकले मागे

Patil_p

हिरोमोटोची नवी मास्टरो एज 110 बाजारात

Patil_p