Tarun Bharat

महिन्याभरात पेट्रोल 3 रुपयांनी वधारले

डिझेलच्या दरात 4 रुपयांनी वाढ : पेट्रोलची निव्वदीकडे वाटचाल

प्रतिनिधी/ बेळगाव

पेट्रोल व डिझेलचे दर पुन्हा एकदा भडकू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढल्याने भारतातही इंधनाच्या दरात वाढ होत आहे. महिन्याभरात पेट्रोल 3 रुपयांनी वधारले आहे. तर डिझेलच्या दरातही 4 रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोल नव्वदीच्या दिशेने वाटचाल करू लागल्याने वाहनचालकांचे आर्थिक गणित कोलमडू लागले आहे.

सोमवारी पेट्रोलच्या दरात 20 ते 30 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोमवारी  बेळगाव शहरात पेट्रोल 86.28 रुपये तर डिझेल 78.13 रुपये दराने विक्री करण्यात येत होते. मागील महिन्याभरापासून प्रत्येक दिवशी इंधनाच्या दरात काही पैशांची वाढ होत आहे. त्यामुळे इंधनाचे दर सर्वोच्च दराकडे चालले आहेत. दरात अशीच वाढ होत राहिल्यास पेट्रोलचे दर नक्वदीच्या पुढे जातील, असे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आज प्रत्येकाजवळ दुचाकी-चारचाकी वाहने आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची मोठय़ा प्रमाणात मागणी असते. परंतु दरवाढ होत असल्याने सर्वसामान्यांना वाहनांमध्ये पेट्रोल घालताना चारवेळा विचार करावा लागत आहे. कोरोनानंतर आताकुठे व्यवसाय हळूहळू तग धरत असतानाच पुन्हा एकदा इंधनाच्या दरवाढीने सर्वसामान्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सरकारने इंधनाचे दर नियंत्रित ठेवण्याची मागणी होत आहे.

Related Stories

हैदराबाद विमानफेरी होणार पूर्ववत

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांची सालहळ्ळी येथे प्रचारसभा

Omkar B

जीआयटी एमबीएमध्ये विद्यार्थी विकास कार्यक्रम

Amit Kulkarni

कावळेवाडीचा सुपुत्र विक्रम नाईक ‘गेट’ परीक्षा उत्तीर्ण

Amit Kulkarni

समाजाप्रती संवेदनशील असणाऱया डॉ.कीर्ती शिवकुमार

Patil_p

चन्नम्मानगर येथे चेन स्नॅचिंगने खळबळ

Patil_p
error: Content is protected !!