Tarun Bharat

महिन्याभरापुर्वी हडफडेत घडलेल्या चोरीचा हणजुण पोलिसांकडून पर्दपाश

Advertisements

प्रतिनिधी /म्हापसा

हडफडें येथील एका खाजगी मालकीच्या पर्यटक ग्रुहात उतरलेल्या  प्रतीक धर्मेश पांडय़ा या पुणे महाराष्ट्र येथील पर्यटकाचे  किंमती लेपटॉप्स तसेच अन्य सामान मिळून दीड लाखांची चोरी करून फरार झालेल्या साळगांवच्या दोघां स्थानिक चोरटय़ांना हणजुण पोलिसांकडून एका महिन्यानंतर  चोरीस गेलेल्या सामानासहित ताब्यात घेण्यात आले. दरम्यान,  चोरीची ही  घटना मागच्या महिन्यात 20 जुलै 2021 रोजी घडली होती. सध्या ताब्यातील दोन्हीकडे आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी फर्मावण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक सुरज गांवस यांनी सांगितले. सविस्तर व्रुत्तानुसार, हडफडें येथील मांडवी नामक खाजगी पर्यटक ग्रुहात पुणे येथील प्रतीक पांडय़ा  हे ग्रुहस्थ उतरले होते. दरम्यान, 20 जुलैला  पांडय़ा  पर्यटनासाठी घराबाहेर पडले  असतां  संशयित रोहन सांळगांवकर (27) मोलेंभाट-सांळगांव यांने दरवाजाचे स्लाइडी?ग ग्रील्स वाकवून घरात प्रवेश केला. यावेळी घरातील किंमती लेपटॉप्स, मोबाईल संच  तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू मिळून अंदाजे दीड लाखाचा ऐवज त्याने लंपास केला. दरम्यान, ही घटना घडून महिना उलटला तरी स्थानिक हणजुण पोलिस यंत्रणा चोरटय़ांच्या सतत मागावर  होती. सरतेशेवटी , परिसरातील सिसीटीवी फुटेजचा आधार घेत  हणजुण पोलीस स्थानकाचे उप-निरीक्षक पार्सेकर तसेच पोलिस पथकाने संशयित रोहीत सांळगांवकर याच्या मुसक्मया आवळण्यात यश मिळवीले तथापि ताब्यातील रोहीतची याबाबतीत कसून चौकशी केली असतां चोरीच्या किंमती वस्तू त्याने  साळगांवतीलच  समीध सांळगांवकर (36)   यांना विकल्याची कबुली पोलिसांना दिली. दरम्यान, या माहितीच्या आधारे हणजुण पोलिसांनी तात्काळ सुमेधला अटक केली  यावेळी त्याच्या ताब्यातील सर्व चोरीच्या वस्तू हणजुण पोलिसांनी ताब्यात घेतल्या. या प्रकरणात महिन्याभरापुर्वी घडलेल्या या चोरीचा छडा लावण्यासाठी हणजुण पोलिस स्था?नकाचे निरीक्षक सुरज गांवस यांच्या मार्गदर्शनाखाली उप-निरीक्षक अक्षय पार्सेकर तसेच कॉन्स्ट?बल अजिंक्मय गोगालें सत्ये?द्र नास्नोडकर, राज परब, तसेच रुपेश आंजगांवकर हे महिनाभर संशयित  चोरटय़ांच्या मागावर होते सरतेशेवटी रोहन सांळगांवकर तसेच समीध सांळगांवकर यांच्या मुसक्मया आवळून त्यां?ची सात दिवसांच्या  पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Related Stories

ऋषिकेश ढवळीकर ठरला अव्वल!

Amit Kulkarni

जुन्या इमारतीचे काँक्रिटचे तुकडे कोसळून युवती जखमी

Amit Kulkarni

धनत्रयोदशीने दिवाळीला 2 नोव्हेंबरपासून प्रारंभ

Amit Kulkarni

सुखासीन ‘सिंगापूर’ही आता भारतीयांना असुरक्षित

Omkar B

काणकोण पालिका बैठकीतील ठरावांची कार्यवाही होत नाही

Amit Kulkarni

विरोधक गोमंतकीयांना चंद्र-तारे ही तोडून देतो म्हणतील – माजी मुख्यमंत्री रवी नाईक

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!