Tarun Bharat

महिलांची बिग बॅश लीग चाहत्यांविना होणार

वृत्त संस्था/ होबार्ट

ऑस्ट्रेलियात होणाऱया महिलांच्या बिग बॅश टी-20 लीग स्पर्धेतील येथे होणाऱया चार सामन्यांवेळी कोरोनाच्या समस्येमुळे पुन्हा प्रेक्षकांविना हे सामने खेळविले जाणार आहेत. होबार्ट आणि टास्मानिया येथे कोरोनाचे नवे रूग्ण वाढत असल्याने या राज्यांच्या प्रमुखानी तीन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.

पर्थ स्कॉर्चर्स आणि ब्रिस्बेन हिट यांच्यात सलामीचा सामना रविवारी खेळविला जाणार आहे. या सामन्यावेळी प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नाही. सिडनी सिक्सर्स आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यातील सामना 17 ऑक्टोबरला होणार आहे. कोरोना समस्येमुळे लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने पुन्हा या स्पर्धेत अडथळा येण्याची शक्यता आहे. मात्र, टास्मानिया प्रशासन आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्याकडून ही स्पर्धा सुरळीत पार पडण्याची ग्वाही दिली जात आहे. या स्पर्धेतील पहिले 24 सामन्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून हे सामने तेथील विविध राज्यांमध्ये खेळविले जाणार आहेत.

Related Stories

सूर्यकुमार यादव आयपीएल स्पर्धेतून बाहेर

Patil_p

33 संभाव्य हॉकीपटूंची घोषणा

Patil_p

सिडनी लेव्हरोन, डुप्लांटीस वर्षातील सर्वोत्तम विश्व ऍथलिट्स

Patil_p

आतंरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचा शिल्पकार हरपला

Patil_p

विंडीज टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर

Patil_p

पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

Patil_p