2022-23 चा अर्थसंकल्प प्रामुख्याने महिला, विद्यार्थी आणि शेतकरी या दोन मुख्य क्षेत्रांना लाभ देण्यासाठी तयार करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत नारी शक्ती, महिला नेतृत्व विकास या योजनांसह मिशन शक्ती, मिशन वात्सल्य, सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 या योजनांना अधिक बळकट करण्याचा मनोदय अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला. सक्षम अंगणवाडी ही एक नवीन पिढीची अंगणवाडी असून त्यामध्ये चांगल्या पायाभूत सुविधा आणि दृकश्राव्य माध्यमे पुरविली जाणार आहेत. या अंगणवाडींच्या माध्यमातून बालवयीन शिक्षणासाठी एक चांगले वातावरण उपलब्ध करण्यात येईल. त्यानुसार दोन लाख अंगणवाडय़ा अत्याधुनिक करणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.


previous post
next post