Tarun Bharat

महिलांवरील अत्याचाराला उत्तेजन करणाऱ्या पोस्ट टाकल्यास कडक कारवाईचा इशारा

प्रतिनिधी/मुंबई

सोशल मीडियावर महिलांवरील अत्याचारांना उत्तेजन देणारे व्हिडिओ किंवा पोस्ट टाकाल तर ते खपवून घेणार नाही. त्यावर तातडीने कारवाई केली जाईल. यामध्ये कुणाचीही गय केली जाणार नाही, अशा कडक शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी इशारा दिला आहे.

लॉकडाऊनच्या काळामध्ये सायबर क्राइमच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. व्हॉट्सअ‌ॅप, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवरून महिलांवरील अत्याचाराला उत्तेजन देणारे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या अफवा पसरविल्या जात असून धार्मित तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टही टाकण्यात येत असून हा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

Related Stories

शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर? नव्या व्हेरियंटमुळे राज्य सरकारला चिंता

Archana Banage

… तर वाईट परिणाम भोगावे लागतील : संभाजी राजे

Tousif Mujawar

`सारथी’च्या 21 विद्यार्थ्यांचा युपीएससीवर झेंडा !

Archana Banage

राज्यात उद्यापासून पावसाचे जोरदार आगमन

Archana Banage

राऊतांचा फडणवीसांना सल्ला; म्हणाले, फंद्यात पडू नका…

Abhijeet Khandekar

TET परीक्षा घोटाळाप्रकरणी IAS खोडवेकर यांना अटक

datta jadhav