Tarun Bharat

महिला ऍथलीट कृष्णा पुनियाला कोरोनाची बाधा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी तसेच राजस्थानची विद्यमान आमदार 43 वर्षीय कृष्णा पुनियाला कोरोनाची बाधा झाली असून तिला जयपूरमधील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

2010 साली दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत कृष्णा पुनियाने महिलांच्या थाळीफेकमध्ये सुवर्णपदक मिळविले होते. पुनियाची कोरोना चाचणी घेण्यात आली असून ती पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. जयपूरमधील राजस्थान विद्यापीठाच्या रूग्णालयात तिच्यावर वैद्यकीय उपचार चालू आहे. कृष्णा पुनियाने काँग्रेसच्या तिकीटावर राजस्थानमधील सदुलपूर मतदार संघातून आमदार पदासाठी निवडणूक लढविली होती आणि तिने या निवडणुकीत विजय मिळविल्याने ती आता राजस्थानची विद्यमान आमदार आहे.

Related Stories

झगडणाऱ्या पंजाब किंग्ससमोर आज मुंबई इंडियन्सचे आव्हान

Amit Kulkarni

बेअरस्टो-वॉर्नरची 160 धावांची सलामी

Patil_p

माजी हॉकीपटू वरिंदर सिंग कालवश

Patil_p

सानिया मिर्झाचे पुनरागमन विजयाने

Patil_p

जोस बटलर करणार वर्ल्ड कप फायनलच्या जर्सीचा लिलाव

Patil_p

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे यंदा प्रथमच‘व्हर्च्युअल’ वितरण

Patil_p