Tarun Bharat

महिला काँग्रेसकडून मडगावात वाढीव वीजबिलांचा निषेध

प्रतिनिधी/ मडगाव

गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी महामारी आणि लॉकडाऊनच्या दरम्यान वीजबिलांत वाढ केली गेली असल्याने सरकारच्या विरोधात पॉवर हाऊस, मडगाव येथे शवपेटी घेऊन निषेध करण्यात आला. वीज उपकरणे तसेच सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली शवपेटी घेऊन हा प्रतिकात्मक निषेध करण्यात आला.                                              

कोविड-19 मुळे सध्या लोकांचा व्यवसाय होत नाही. कित्येकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. महागाईमुळे आधीच जनता मेटाकुटीला आली आहे. त्यातच हातात पैसा नाही. अशा परिस्थितीत वीजबिले वाढविली गेल्याने कित्येकांना आपले सोन्याचे दागिने व अन्य वस्तू गहाण ठेकून वा विकून वीजबिले भरावी लागत आहेत. त्यामुळे शवपेटीमध्ये प्रतिकात्मक स्वरूपात दागिने व अन्य वस्तू ठेवून हा निषेध करण्यात आल्याचे गोवा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ऍड. प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगितले.

दरम्यान, आपल्या विरोधात दाखल केलेली तक्रार ही भाजप सरकारची चेष्टा करण्याचा विषय बनली आहे. सदर यंत्रणा आपला आवाज दडपण्यासाठी वापरली जात होती. पण गोव्याची प्रतिनिधी या नात्याने ते आपला आवाज दाबू शकत नाहीत हे त्यांना समजले पाहिजे, असे कुतिन्हो यांनी म्हटले आहे. यावेळी दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्षा ग्रिसल डिसोझा, लालन पार्सेकर, रेश्मा सय्यद, प्रतिमा बांदेकर, रमा आमोणकर, रोशिनी सईद, अमिना सईद आणि अन्य महिला काँग्रेस सदस्या उपस्थित होत्या.

Related Stories

नागोवात माजी उपसरपंच ऍड. दिलेश्वर नाईक यांची बिनविरोध निवड

Amit Kulkarni

पांडुरंग राऊत यांचे निधन

Amit Kulkarni

म्हादईसाठी प्रसंगी पदत्यागाचीही तयारी

Patil_p

डिचोली पालिकेच्या 14 प्रभागांसाठी 88 टक्के मतदान.

Patil_p

ग्रामीण भागात शैक्षणिक साधनसुविधा निर्माण होणे गरजेचे

Amit Kulkarni

म्हापसा पार्किंग प्रश्नी विरोधक आक्रमक

Amit Kulkarni