Tarun Bharat

महिला टी-20 चॅलेंजसाठी संघ, कर्णधार घोषित

हरमनप्रीत, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा यांच्याकडे नेतृत्व, 23 मे पासून सुरुवात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय महिला संघातील स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा यांची या महिन्यात होणाऱया आयपीएल महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेतील तीन संघांच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. 23 मे पासून ही स्पर्धा पुण्यामध्ये सुरू होणार आहे.

सोमवारी बीसीसीआयने या स्पर्धेतील तीन संघांतील खेळाडूंची यादी जाहीर केली. हरमनप्रीत कौर सुपरनोव्हाजचे, स्मृती मानधना ट्रेलब्लेझर्सचे आणि दीप्ती व्हेलोसिटी संघाचे नेतृत्व करणार आहे. 2020 मध्ये झालेल्या आवृत्तीत ट्रेलब्लेझर्सने विजेतेपद मिळविले होते. अनुभवी मिताली राज, झुलन गोस्वामी, शिखा पांडे यांनी याआधीच्या स्पर्धेत भाग घेतला होता. पण यावेळी त्यांना वगळण्यात आले आहे. या तीन संघांत एकूण 12 विदेशी महिला क्रिकेटपटूंना स्थान देण्यात आले असून त्यात दक्षिण आफ्रिकेची स्टार लॉरा वुलव्हार्ट, जागतिक अग्रमानांकित गोलंदाज सोफी एक्लेस्टोन यांचा समावेश आहे. थायलंडची नथाकन चांतम या स्पर्धेत प्रथमच खेळणार आहे. लेगस्पिनर ऍलाना किंग या ऑस्ट्रेलियाच्या एकमेव खेळाडूला स्थान मिळाले आहे तर इंग्लंडच्या एक्लेस्टोन, सोफी डंकली, केट क्रॉस यांचा समावेश आहे. बांगलादेशच्या सलमा खातून व शरमिन अख्तर यांनाही संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयने जाहीर केलेले संघ पुढीलप्रमाणे आहेत.

सुपरनोव्हाज ः हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया, ऍलाना किंग, आयुष सोनी, चंदू व्ही., दियांद्रा डॉटिन, हरलीन देओल, मेघना सिंग, मोनिका पटेल, मुस्कान मलिक, पूजा वस्त्रकार, प्रिया पुनिया, राशी कनोजिया, सोफी एक्लेस्टोन, सुने लुस, मानसी जोशी.

ट्रेलब्लेझर्स ः स्मृती मानधना (कर्णधार), पूनम यादव, अरुंधती रेड्डी, हेले मॅथ्यूज, जेमिमा रॉड्रिग्ज, प्रियांका प्रियदर्शिनी, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग, रिचा घोष, एस. मेघना, सायका इशाक, सलमा खातून, शरमिन अख्तर, सोफी ब्राऊन, सुजाता मलिक, एस.बी.पोखरकर.

व्हेलोसिटी ः दीप्ती शर्मा (कर्णधार), स्नेह राणा, शफाली वर्मा, अयाबोंगा खाका, केपी नवगिरे, कॅथरीन क्रॉस, कीर्ती जेम्स, लॉरा वुलव्हार्ट, माया सोनवणे, नथाकन चांतम, राधा यादव, आरती केदार, शिवाली शिंदे, सिमरन बहादुर, यास्तिका भाटिया, प्रणवी चंद्रा.

Related Stories

सिंधू, लक्ष्य सेन अंतिम फेरीत

Patil_p

बुंदेस्लीगा स्पर्धेतील विक्रमाशी लेवान्डोवस्कीची बरोबरी

Patil_p

महेंद्रसिंग धोनीचा मोर्चा आता सेंद्रीय शेतीकडे!

Patil_p

ऍटलेटिकोकडून बार्सिलोना पराभूत

Patil_p

प्रो कबड्डी लिग ः दोन्ही सामने टाय

Patil_p

स्पेनच्या नदालला पराभवाचा धक्का

Patil_p