Tarun Bharat

महिला तुरुंग अधिकाऱ्यास उज्वला झेंडेची गोळी घालण्याची धमकी

मुलग्याची चौकशी करु नये म्हणून धमकावले

कोल्हापूर / प्रतिनिधी

बडतर्फ महिला पोलीस हवालदार उज्वला झेंडे हिने कळंबा कारागृहातील महिला अधिकाऱ्यास कारागृहाच्या बाहेर बोलावून थेट गोळ्या घालण्याची धमकी दिली. याबाबतची फिर्याद मिरा विजय बाबर (वय 38 रा. शासकीय निवासस्थान, कळंबा कारागृह) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. यानुसार उज्वला झेंडे , बंगे (पुर्ण नाव समजू शकले नाही) या दोघींवर सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मिरा बाबर या कळंबा कारागृहात तुरुंगाधिकारी म्हणून कर्तव्यास आहेत. त्या 1 जानेवारी रोजी सर्कल क्रमांक 6,7,8 येथे कर्तव्यास होत्या. त्यांनी कारागृहातील बंदी अभिनंदन रतन झेंडे याची चौकशी केली होती. याची माहिती त्याने आपली आई उज्वला झेंडे यांना दिली. शनिवारी दुपारी उज्वला झेंडे व तिची साथीदार बंगे नामक महिला कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आल्या. त्यांची तेथील बंदोबस्तासाठी असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसोबत वादावादी झाली. यानंतर झेंडे हिने मिरा बाबर यांना बोलावून आणण्यास सांगितले. मिरा बाबर या ठिकाणी आल्यानंतर उज्वला झेंडे हिने माझ्या मुलग्याकडे गोळी कोणी मारली याबाबत विचारणा करायची नाही. अजूनही माझ्यात गोळ्या घालण्याची हिंमत आहे. मी गोळ्या घातलेल्या आहेत. अजूनही गोळ्या घालू शकते. अशी धमकी दिली. यानंतर या घटनेची माहिती मिरा बाबर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. यानुसार उज्वला झेंडे व बंगे नामक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Stories

चित्रपट महामंडळाचा निवडणूक कार्यक्रम तयार

Archana Banage

हल्ल्यानंतर ओवैसींना झेड प्लस सुरक्षा

datta jadhav

श्रीलंकेत मध्यरात्री संपूर्ण कॅबिनेटचा राजीनामा

datta jadhav

भारतात २३७ अब्जाधीश; अदानी कुटुंबाने सर्वाधिक कमावले; दिवसाला १ हजार २ कोटी

Archana Banage

विद्यापीठ हायस्कूलचे निवृत्त शिक्षक वि. गो. देसाई यांचे निधन

Archana Banage

मुंबईत मुसळधार : रस्ते वाहतूक; हार्बल – मध्य रेल्वे ठप्प

Tousif Mujawar