Tarun Bharat

महिला धावपटू धनलक्ष्मीला सुवर्णपदक

Advertisements

वृत्तसंस्था/ अलमेटी (कझाकस्तान)

येथे रविवारी झालेल्या क्युसेनोव्ह स्मृती ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताची महिला धावपटू सेकर धनलक्ष्मीने 200 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविताना तिसऱया क्रमांकाची सर्वात जलदवेळ नोंदविली.

महिलांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत धनलक्ष्मीने 22.89 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक पटकाविले. धनलक्ष्मीची ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे. चेन्नईमध्ये झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य ऍथलेटिक्स स्पर्धेत धनलक्ष्मीने महिलांच्या 200 मी. शर्यतीत सुवर्णपदक मिळविताना 23.27 सेकंदाचा अवधी नोंदविला होता. मात्र अमेरिकेत 15 ते 24 जुलै दरम्यान होणाऱया विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी धनलक्ष्मीला पात्र फेरीसाठीची वेळ (22.80) नोंदविता आली नाही त्यामुळे तिला या स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध करता आली नाही. या स्पर्धेत सहभागी न होता भारताचे ऍथलीटस् तेजिंदरपाल सिंग, रोहित यादव हे मायदेशी दाखल झाले. आगामी विश्वचषक ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी पात्रतेचा कालावधी रविवारी मध्यरात्री समाप्त झाल्याने भारताचे हे दोन्ही ऍथलीटस् मायदेशी दाखल झाले.

Related Stories

रवींद्र जडेजा सर्वोत्तम भारतीय क्षेत्ररक्षक : ब्रॅड हॉग

Patil_p

वरिष्ठांची राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धा केरळमध्ये

Patil_p

राष्ट्रकुलमध्ये चार पदके मिळण्याचा झरीनला विश्वास

Patil_p

ख्रिस गेल सुपरओव्हरपूर्वी का नाराज होता?

Patil_p

विंडीजकडून लंकेचा वनडे मालिकेत ‘व्हाईट वॉश’

Patil_p

एचएस प्रणॉयची बॅडमिंटन संघटनेकडे क्षमायाचना

Patil_p
error: Content is protected !!