Tarun Bharat

महिला बॉक्सर्सचे एचपीडी राफाएल यांचे इटलीस प्रयाण

Advertisements

पत्नी आजारी असल्याने मायदेशी रवाना, पंधरा दिवसानंतर परतण्याची अपेक्षा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय महिला बॉक्सर्ससाठी नियुक्त केलेले हाय परफॉर्मन्स डायरेक्टर राफाएल बर्गामास्को पत्नी आजारी असल्याने मायदेशी इटलीला परत गेले आहेत. ते इटलीतील असिसी येथील रहिवासी असून त्यांच्या पत्नीला कर्करोग झाला आहे.

एअर इंडियाच्या विमानाने बुधवारी त्यांनी मायदेशी प्रयाण केले असून सुमारे पंधरा दिवसानंतर भारतात ते पुन्हा दाखल होण्याची अपेक्षा असल्याचे भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे कार्यकारी संचालक आरके सचेती यांनी सांगितले. ‘मी सध्या इटलीमध्ये असून पत्नीलाही घरी आणण्यात आले आहे. तिची तब्येत आता सुधारत आहे,’ असे राफाएल यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

49 वर्षीय राफाएल 2017 पासून भारतीय संघासमवेत असून लॉकडाऊनमुळे गेले दोन महिने ते दिल्लीतील आयजी स्टेडियममध्येच वास्तव्य करीत आहेत. ‘त्यांच्या पत्नीवर केमोथेरपी करण्यात येणार होती, यासाठी राफाएल त्यांच्यासोबत राहण्यासाठी मायदेशी गेले आहेत. विमानसेवा वेळेत सुरू झाल्यामुळेच त्यांना मायदेशी परतणे शक्य झाले आहे. दहा ते पंधरा दिवसांनंतर ते परत भारतात दाखल होतील,’ असे सचेती यांनी सांगितले. भारताच्या महिला बॉक्सर्ससाठी नियुक्त करण्यात आलेले बर्गामास्को हे केवळ दुसरे विदेशी प्रशिक्षक आहेत. त्यानंतर त्यांना हाय परफॉर्मन्स डायरेक्टरपदी बढती देण्यात आली.

सध्या जगभरात कोरोना महामारीने धुमाकूळ घातला असून त्याचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांत इटलीचाही समावेश आहे. तेथे सुमारे अडीच लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून 33,000 हून अधिक बळी गेले आहेत. भारतीय महिला बॉक्सर्सचे राष्ट्रीय शिबिर 10 जूनपासून सुरू करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र आता त्याला विलंब होणार असल्याचे सचेती यांनी सांगितले.

Related Stories

युरोपियन ऍथलेटिक्स स्पर्धा रद्द

Patil_p

टी-20 मालिकेत पाकची पुन्हा इंग्लंडवर आघाडी

Amit Kulkarni

मर्सिडीजच्या हॅमिल्टनची शुमाकरच्या विश्वविक्रमाशी बरोबरी

Patil_p

भारत-डेन्मार्क डेव्हिस लढत 4 मार्चपासून

Patil_p

भारतीय मल्लांना पहिला दिवस अपयशी

Patil_p

ऑस्ट्रेलियन महिला संघाची अव्वलस्थानी झेप

Patil_p
error: Content is protected !!