Tarun Bharat

महिला बॉक्सिंग : नीतूचा पदार्पणातच विजय

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इस्तंबुलमध्ये सुरू असलेल्या आयबीए महिला विश्व मुष्टियुद्ध चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण करणाऱया भारताच्या नीतूने रोमानियाच्या अनुभवी स्टेलुटा डुटाचा पराभव करून शेवटच्या सोळांमध्ये स्थान मिळविले.

दोनवेळची माजी युवा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या नीतूने स्ट्रँडा मेमोरियल स्पर्धेतही  शानदार प्रदर्शन करीत सुवर्ण मिळविले होते. तोच जोम तिने या स्पर्धेत कायम राखत विजय मिळविला. 40 वर्षीय स्टेलुटावर तिने तीनही फेऱयांत वर्चस्व राखत  विजय मिळविला. दोन्ही बॉक्सर्सनी प्रारंभापासून आक्रमक खेळ केला. पण नीतूने सरस कामगिरी करीत पहिल्या फेरीत बाजी मारली. दुसऱया फेरीतही दोघींचे एकमेकावर आक्रमण चालूच राहिले. पण नीतूने उंचीचा लाभ घेतला तर स्टेलुटाला नंतर संघर्ष करावा लागला. तिसऱया फेरीत हरियाणाच्या नीतूने पंचेसचा भडिमार केला. यातील शेवटच्या तीन मिनिटांत दोघींनी जोरदार संघर्ष केला. मात्र नीतूने भक्कम बचाव करीत विजय साकार केला. स्टेलुटाने आजवर या स्पर्धेत तीन रौप्यपदके मिळविली असून तीनही वेळा तिला भारतीय बॉक्सर मेरी कोमकडूनच अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. मेरी कोमने यावेळी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. नीतूची पुढील लढत शनिवारी स्पेनच्या मार्टा लोपेझ डेल अर्बोलशी होणार आहे.

2019 आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविलेल्या निखत झरीनची (52 किलो गट) लढत मेक्sिसकोच्या हेरेरा अल्वारेझशी होणार आहे. याशिवाय मनीषा (57 किलो), परवीन (63 किलो), सवीती (75 किलो) यांच्याही पहिल्या लढती होणार आहेत. 73 देशांच्या 310 बॉक्सर्सनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. मनीषाला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता, तिची लढत आता नेपाळच्या कला थापाशी होईल तर परवीन व सवीतीची लढत अनुक्रमे युक्रेनची मारीया बोव्हा व इंग्लंडची केरी डेव्हिस यांच्याशी होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी लवलिना बोर्गोहेनने भारताला कांस्यपदक मिळवून दिले आहे.

Related Stories

भारत-इंग्लंड यांच्यात 2022 जुलैमध्ये एकमेव कसोटी

Patil_p

भारताचा यजमान जॉर्डनवर निसटता विजय

Patil_p

भारतीय महिला हॉकी संघाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

Patil_p

गोपीचंदसह 4 प्रशिक्षक उपलब्ध करुन द्या

Patil_p

हाय परफॉर्मन्स डायरेक्टर व्होकर हर्मन यांचा राजीनामा

Omkar B

न्यूझीलंडचा बांगलादेशवर एकतर्फी विजय

Patil_p
error: Content is protected !!